V. N. Naik Institution Election esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election: प्रचारातील हेव्‍यादाव्‍यांची खमंग चर्चा; व्‍हॉट्‌सॲप ग्रुपवर निवडणुकांचा विषय रंगतोय

V. N. Naik Institution Election : अवघ्या सहा दिवसांवर मतदान आलेले असताना अंतिम टप्प्‍यात निवडणुकीला हेव्‍यादाव्‍यांची फोडणी मिळते आहे.

सकाळ वृत्तसेवा

V. N. Naik Institution Election : अवघ्या सहा दिवसांवर मतदान आलेले असताना अंतिम टप्प्‍यात निवडणुकीला हेव्‍यादाव्‍यांची फोडणी मिळते आहे. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत चारही पॅनल प्रचारादरम्‍यान तोफ डागत असून, सभांप्रमाणेच व्‍हॉट्‌सॲप ग्रुपवरही निवडणुकांचा विषय रंगतो आहे. येत्‍या २७ जुलैला सकाळी आठपासून मतदानाला सुरवात होणार आहे. (important discussion of campaign claim is taking place on WhatsApp group )

अवघ्या काही दिवसांची निवडणूक उरलेली असताना, प्रचार ऐन रंगात आला आहे. यापूर्वीपर्यंत बहुतांश सर्वच पॅनलकडून ‘आस्‍ते कदम’ची भूमिका घेताना सावधगिरीतून प्रचार सुरू ठेवला होता. यादरम्‍यान पॅनलमधील उमेदवारांची निवड, तालुक्‍यांना दिलेले प्रतिनिधित्व, जुन्‍या-नव्‍यांची घातलेली सांगड, तसेच पॅनलचा जाहीरनामा आदींबाबत चर्चा केली जात होती. (latest marathi news)

परंतु आता अंतिम टप्प्‍यात मातब्‍बरांकडून तोफ डागली जात असून, प्रतिस्‍पर्धी पॅनलच्‍या कामगिरीविषयी, उमेदवारांविषयी हेवेदावे सुरू झालेले आहे. सभांमधील वक्‍तव्‍यांपासून पॅनलकडून घेतलेल्‍या भूमिका आदींविषयी थेट समाजाच्‍या व्‍हॉट्‌सॲप ग्रुपवरही चर्चा रंगते आहे. त्‍यामुळे सभासदांचे निखळ मनोरंजन सध्या सुरू असल्‍याचे बघायला मिळत आहे. मतदानाच्‍या दिवसापर्यंत हेव्‍यादाव्‍यांना अधिकच धार येण्याचीदेखील शक्‍यता आहे.

आदर्श आचारसंहितेचे स्‍मरण

सर्वच पॅनलप्रमुखांना निवडणूक मंडळातर्फे आदर्श आचारसंहितेचे स्‍मरण करून दिले जाते आहे. यामध्ये प्रतिस्‍पर्धी उमेदवारांच्‍या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे टाळावे, मतदारांना प्रलोभने देऊ नये यांसह इतर मुद्दे निश्‍चित केले असून, लवकरच निवडणूक मंडळातर्फे माध्यमांना व पॅनलप्रमुखांना ते उपलब्‍ध करून दिले जाणार असल्‍याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT