suicide  esakal
नाशिक

Nashik News : वेगवेगळ्या घटनात दोघांनी उचलला टोकाचा पाउल

Nashik : पाथर्डी फाटा परिसरात महिलेने तर, उपनगर परिसरात इसमाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात महिलेने तर, उपनगर परिसरात इसमाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वर नगरमध्ये प्रिया संदीप म्हस्के (३५, रा. शिवप्राईड अपार्टमेंट) यांनी गुरुवारी (ता. १६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या हॉलमध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. ()

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरी घटना जयभवानी रोडवरील जाचक मळ्यात घडली. बाळासाहेब सुरेश जाचक (४५, रा. जाचक मळा, जयभवानी रोड) यांनी शुक्रवारी (ता. १७) दुपारी बारापूर्वी राहत्या घरात छताला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

ते घरात एकटेच होते. त्यांची पत्नी अवंतिका यांनी त्यांना तत्पूर्वी मोबाईलवरून संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीतील विशाल लोळगे यांना घरी पाठविले असता, त्यावेळी जाचक यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT