Women buying vegetables in the market. esakal
नाशिक

Nashik Vegetable Market: भाजीपाल्याच्या आवकेत वाढ! भाजीपाला उत्पादकांचा हिरमोड; उत्पादनापेक्षा लागवडीचाच खर्च पडतोय महागात

Nashik News : मागील आठवडाभरापासून यार्डात व किरकोळ आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्यांचे भाव गडगडल्याने कमी पाण्यात पालेभाजीतून उत्पादन चांगले मिळेल, या आशेवर अससेल्या उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. मार्केट यार्डासह किरकोळ बाजारातही पालक, मेथी अक्षरशः पाच व दहा रुपये भावाने विकली जात आहे. यामुळे उत्पादकांना माल घेऊन जाण्याचे भाडे मिळणेही दुरापास्त झाले आहे. (nashik Increase in arrival of vegetable igatpuri taluka marathi news)

मागील आठवडाभरापासून यार्डात व किरकोळ आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र पाण्याची कमतरता असून, कमी वेळेत काही प्रमाणात भाजीपाला काढून त्याच्या विक्रीतून चार पैसे पदरात पडतील, म्हणून पालेभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती.

मात्र, बाजारात अचानक पालेभाज्यांची आवक वाढली. मागणी तेवढीच राहिल्याने भाव कोसळले आहेत. यार्डात भाजीपाला आणल्यानंतर त्याला भावच न मिळाल्याने लागवडीचा नव्हे, तर वाहतुकीचा खर्चही निघाला नाही. (Latest Marathi News)

पालेभाज्यांचे दर प्रतिजुडी (किरकोळ बाजारातील दर)

पालक : ५ ते १० रुपये

मेथी : ७ ते १० रुपये

शेपू : ७ ते १० रुपये

कांदापात : ७ ते १० रुपये

कोथिंबीर : ५ ते १० रुपये

"मी नियमित भाज्यांचे उत्पादन घेतो. आता अर्धा एकर मेथी आणि कोथिंबिरीचे गौरी वाण पेरले होते. बियाणे, लागवड व काढणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मात्र, अपेक्षित माल तयार होऊन मनासारखा बाजारभाव न मिळाल्याने अर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे मन:स्ताप होतो."-शिवानंद नळे, शेतकरी

"मी दोन एकर शेतावर कोथिंबीर लागवड केली. भरपूर कोथिंबीर आली, पण कवडीमोल भाव मिळाला. रोजचा काढणीचा मजुरी खर्चही निघत नाही. लागवडीचा खर्च बाजूलाच राहिला. उलट नुकसान झाले. आता कोथिंबीर काढणे सोडले आहे."-पांडुरंग जाधव, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT