Instant Loan
Instant Loan esakal
नाशिक

Instant Loan Scheme : झटपट कर्ज ‘अमाप’, पालकांच्या डोक्याला ‘ताप’! तरुणाई कर्जाच्या विळख्यात

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : पूर्वी कर्ज घ्यायचे म्हटले, की बँकेत ओळख, दोन जामीनदार, हप्त्याची जुळणी, सामाजिक प्रतिष्ठा, अशा अनेक गोष्टी आता मागे पडत आहेत. सध्या नवनव्या ऑनलाईन कंपन्यांकडून मोबाईलच्या एका क्लीकवर झटपट कर्जाचा फंडा सुरू आहे. (nashik increasing Instant loan schemes marathi news)

या कर्जामुळे तरुणाईला रक्कम उचलण्याची चटक लागल्याचे दिसून येते. मात्र, या कर्जामागील १८ ते ३६ टक्के व्याजाचा ससेमीरा घेऊन कंपनीचे वसुली कर्मचारी दारात येताच पालकांची त्रेधा उडत आहे. एक हजार रुपयाचे कर्ज घ्या, ते फेडा. पुढील कर्ज पाच हजार घ्या आणि ते फेडा, अशी रक्कम वाढत जाऊन ३० हजारांपर्यंतचे पर्सनल लोन सहज मिळवा, अशा फंदात सध्या तरुणाई गुरफटली आहे. गेल्या काही दिवसांत याचे पेव फुटल्याचे दिसत आहे. वसुली करणारे दारात येऊन उभे राहत असल्याने पालकांच्या तोंडचे पाणी पळत आहे. यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत.

कर्जाच्या परतफेडीची खात्री काय?

केवळ दोन कागदपत्रांच्या आधारे कंपन्यांचे कर्मचारी कर्जवाटप करीत आहेत. यातून चैनीसाठी अशी कर्ज उचलणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कर्जाची परतफेड करण्याचे उत्पन्नाचे मार्ग नसणाऱ्यांना अशी खिरापत वाटून या कंपन्यांनी मात्र आपली उद्दिष्ट साधल्याचे चित्र आहे.  (latest marathi news)

पेपरलेस, पाच मिनिटांत कर्ज

अवघ्या पाच मिनिटांत आणि पेपरलेस कर्जाची रक्कम ग्राहकाला दिली जात आहे. ऑनलाईन, तसेच ऑफलाईन पद्धतीने व्यवहार करून कर्ज पुरवले जाते आहे. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ३० ते ३६ टक्के व्याजाने आपण कर्ज घेत असल्याची समोरच्याला पुसटशी कल्पनाही नसते.

पालकांच्या अपरोक्ष मुले परस्पर अशी कर्ज उचलत आहेत. या व्यवहाराची कोणतीच कल्पना घरच्यांना नसते. वसुलीसाठी येणाऱ्यांना कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत आहे. या पैशांचा मुलाने कशासाठी वापर केला, हे विचारण्याऐवजी पालक प्रतिष्ठेपोटी कर्ज स्वतःच भरत आहेत.

"मोबाईलवर खासगी कंपन्यांकडून झटपट कर्ज देण्यासाठी ऑफर दिल्या जातात. नंतर अधिक व्याजदराने कर्जाची वसुली केली जाते. खासगी कंपन्यांकडून व ॲपच्या माध्यमातून कोणतेही कर्ज घेऊ नये. ॲपच्या माध्यमातून कोणताही व्यवहार केल्यास फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे."-अशोक शाह, बँकिग क्षेत्रातील तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Oath Ceremony : मुळशीचा पैलवान होणार देशाचा क्रीडा मंत्री?

Bus Conductor Viral Video: फुल ऑन ॲक्शन! कंडक्टर ठरला देवदूत, नेटकरी करतायेत कौतूक, पोलिसांनी केला सत्कार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर मोठी त्रुटी, एका विमानाचं उड्डाण होत असताना दुसऱ्या विमानाचं झालं लँडिंग

Munjya: 'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर जादू; दोन दिवसात केली एवढी कमाई

Mumbai Crime News: धक्कादायक! आधी अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् नंतर लैगिंक अत्याचार; मुंबईतील घटना

SCROLL FOR NEXT