dengue  esakal
नाशिक

Nashik Dengue Update : महापालिकेचा वैद्यकीय विभाग खडबडून जागा; डेंगीच्या पार्श्वभूमीवर घरभेटी वाढविल्या

Nashik News : शहरामध्ये डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिकेचा वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरामध्ये डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिकेचा वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला आहे. शुक्रवारी (ता. ५) दिवसभरात खासगी ठिकाणी कारवाई करताना एसटी डेपोच्या कार्यालयाला ही नोटीस बजावण्यात आली आहे. (increasing number of dengue patients in city central team has entered Nashik)

जून महिन्यात शहरात डेंगीचे १६१ बाधित रुग्ण आढळून आले होते. एकूण २७१ डेंगी रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. डेंगी रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे पथक नाशिकमध्ये पाहणीसाठी दाखल झाले.

पथकाला रुग्णसंख्या संदर्भात माहिती देण्यात आली. गोविंदनगर भागातील एक ७० वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर संभाजी चौकातील एका इमारतीत व उंटवाडीतील एका बांधकाम प्रकल्पावर डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. (latest marathi news)

त्यामुळे तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी दिवसभरात एका बंगल्याच्या आवारात डेंगी अळ्या आढळल्याने आठशे रुपयांचा दंड करण्यात आला. एसटी डेपोच्या कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली. मलेरिया विभागाने डेंगीच्या पार्श्वभूमीवर घरभेटी वाढविल्या आहे.

ज्या घरात डेंगीच्या अळ्या आढळतील तेथे प्रतिस्पॉट दोनशे रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती आलेल्या विभागाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सिडकोतील माईल स्टोन कंट्रक्शनला पाच हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT