IG jayant naiknavare Latest News
IG jayant naiknavare Latest News esakal
नाशिक

Nashik News : नाशिक खरंच सुंदर शहर; आणखी सुंदर होऊ शकते : मावळते आयुक्त नाईकनवरे यांना आशावाद

नरेश हाळणोर

नाशिक : शहरांमध्ये शासकीय अधिकारी येतात-जातात. सुंदर शहर घडविणे एकट्या अधिकाऱ्याचे काम नाही. कोणा एकामुळे सुंदर शहर निर्माण होऊ शकत नाही. संघटितरित्या काम केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. नाशिक शहर खरंच खुप सुंदर शहर आहे. या शहराला धार्मिक इतिहास असल्याने नाशिककरही समजूतदार आहेत. ते आणखी सुंदर होऊ शकते परंतु, त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. तसे झाल्यास देशातील सुंदर शहर म्हणून नाशिक नावारुपाला येऊ शकते असा आशावाद शहराचे मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी व्यक्त केला. (Nashik indeed beautiful city Can be more beautiful Optimism to ex Commissioner Naiknavare Nashik Latest Marathi News)

शहराचे मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची अमरावती पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून येत्या दोन दिवसात रुजू होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी आयुक्त नाईकनवरे यांनी मुक्त संवाद साधताना, नाशिक शहराविषयी बोलताना काहीसे भावूक झाले होते.

नाईकनवरे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणा असते आणि नागरिकांच्या समस्यांच्या शेवटचे टोक हे पोलीस असतात. त्यामुळे पोलिसांकडे घटना घडून गेल्यानंतरची समस्या येत असते. ती सोडविताना संबंधितांला धीर देणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे हेच पोलिसांचे काम असते. मात्र अनेकदा पोलीस यंत्रणा अनेकांचे सॉफ्ट टार्गेट असते. अर्थात तो प्रत्येकाचा हक्क आहे हेही मान्यच केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

४० टक्के चालकांकडून हेल्मेटचा वापर

नाशिकमध्ये ४० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. उर्वरित ६० टक्के दुचाकीचालकांना हेल्मेट वापरावे यासाठी पोलिसांना दंडात्मक कारवाई करावी लागते. परंतु, ते वाद घालून दंडही भरतात परंतु हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब त्यांच्या जीवितासाठी धोकादायक आहे हे त्यांनाही समजते परंतु तरीही ते वापरत नाहीत, याचे आश्‍चर्य वाटते. शहरातील किमान ७० टक्के दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरले तरीही शहरातील अपघाती मृत्युचे प्रमाणात मोठी घट दिसून येईल.

मात्र, असे प्रयत्न फक्त पोलिसांकडून होणे अशक्य आहे. त्यासाठी संघटितरित्या काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही जागरुकता दाखवून हेल्मेट वापरले पाहिजे. ते बंधनकारक असो की नसो ते वापरणे सुरू केले की आपोआप वाहनचालकांना शिस्त लागते. त्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज भासणार नाही, असेही आयुक्त नाईकनवरे म्हणाले.

आयुक्त झालो हेच धक्कादायक

गेल्या ३० वर्षांच्या पोलिस सेवेत कारकिर्दीत पहिल्यांच पोलीस आयुक्तपद म्हणून नाशिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वी अन्य विभागांमध्ये काम करीत असताना अत्यंत कमी मनुष्यबळ आणि कोणताही लावाजामा आसपास नव्हता. आयुक्त म्हणून नाशिकमध्ये रुजू झाल्यानंतर काही प्रोटोकॉल असतात, आसपास सज्ज अधिकारी, कर्मचारी असतात याची सवय होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागला.

पण एकूणच अनुभव चांगला होता. आयुक्त म्हणून माझ्याकडे येणारा पोलीस अधिकारी असो वा कर्मचारी यांना समोरच्या खुर्च्यांमध्ये बसवूनच त्यांच्याशी बोललो. का त्यांना समोर उभे करून बोलावे ? समोर खुर्च्या या बसण्यासाठीच असतात ना... असेही ते काहीसे भावूक होत आयुक्त नाईकनवरे यांनी मन मोकळे केले.

त्याचेही समाधान

नाशिक पोलीस आयुक्तालयात जयंत नाईकनवरे हे २० वे आयुक्त होते. त्यांची आठ महिन्यांची कारकिर्दी होती. तर आयुक्तालयात सर्वात कमी कारकिर्द ही विनोद लोंखडे यांची राहिली आहे. लोखंडे हे ४ जून २००११ ते १९ जानेवारी २०१२ या ८ महिने आयुक्तपदी होते. तर नाईकनवरे यांची कारकिर्द ही २१ एप्रिल २०२२ ते १३ डिसेंबर २०२२ (बदलीची तारीख) अशी राहिली. सर्वात कमी कारकिर्द न राहिल्याचे समाधान आयुक्त नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT