nashik air service esakal
नाशिक

नाशिक-इंदूर हवाईसेवा होणार सुरू; ओझर विमानतळावरून विमानसेवा

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याने ओझर विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता आता स्टार एअर कंपनीने १८ जुलैला एक दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू होणार आहे. (Nashik-Indore-Trial-Base-Air-Service-marathi-news-jpd93)

प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू

जानेवारी व फेब्रुवारीत ओझर विमानतळावरून सुरू झालेल्या हवाई सेवेने अठरा हजार प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवून विक्रम केला होता. परंतु मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाने सर्व प्रकारच्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता टप्प्याटप्याने पुन्हा सेवा सुरू होत आहे. २ जुलैला स्टार एअरवेज कंपनीची बेळगाव-नाशिक सेवा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी ट्रू-जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद सेवा सुरू झाली. त्याच्या आदल्या दिवशी एअर अलायन्स कंपनीची नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव हवाई सेवा सुरू झाली. आता स्टार एअर कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीनुसार एक दिवसासाठी सेवा असेल. प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू केली जाणार आहे. रविवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी इंदूरहून विमानाचे उड्डाण होईल. ओझर विमानतळावर ते सायंकाळी साडेसहाला पोचेल.

ऑगस्टमध्ये कोलकता जोडणार

स्पाइस जेट कंपनीने नाशिक-कोलकता सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लॉकडाउनमुळे त्याला मुहूर्त मिळाला नाही. आता ऑगस्टमध्ये कोलकता हवाई सेवेचे नियोजन आहे. नाशिक-दिल्ली-बेंगळुरू-हैदराबाद ही सेवादेखील जुलैअखेर सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

Mangalwedha News : फार्मर आयडी असूनही पोर्टलवर दाखवत नसल्याने कर्जमाफी लटकली

SCROLL FOR NEXT