Death Infant esakal
नाशिक

Nashik News : ह्रदयद्रावक घटना! जन्मत:च मयत अर्भकाला पुरायला जागा सापडेना, गोदाघाटावर दिले टाकून; परिचारिकेमुळे झाला उलगडा

Nashik News : जन्मदात्या बापाला नाशिकमध्ये त्यांच्या बाळाला पुरण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे तो गोदाघाटावर गेला अन्‌ मृत बाळाला दुतोंड्या मारुतीजवळ पाण्यालगतच्या पायरीवर ठेवून निघून गेला....

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दोन मुलींच्या पाठीवर मुलगा जन्मला पण, अपुऱ्या महिन्यांचा असल्याने तो मयत झाला. आदिवासी समाजात मृतदेह जमिनीत पुरण्याची प्रथा. परंतु जन्मदात्या बापाला नाशिकमध्ये त्यांच्या बाळाला पुरण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे तो गोदाघाटावर गेला अन्‌ दुतोंड्या मारुतीजवळ पाण्यालगतच्या पायरीवर ठेवून निघून गेला.... (Nashik Crime infant dead at birth abandoned on Godaghat)

मात्र, गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीजवळ नवजात मयत पुरुष जातीचे अर्भक बुधवारी (ता.३) सायंकाळी सापडल्याने एकच खळबळ उडाली. परंतु पंचवटी पोलिसांनी मयत अर्भकाच्या हातावर असलेल्या हॉस्पिटलच्या टॅगवरून तपास केला असता साऱ्याच प्रकरणाचा उलगडा झाला.

पंचवटी पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत जिल्हा रुग्णालय गाठले असता, वैद्यकीय अधिकार्याने तपासून मयत सांगितले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या परिचारिकेने अर्भकावर लावलेला टॅग आणि त्यावर कल्पना चौरे असलेले नाव पाहून हा टॅग जिल्हा रुग्णालयाचाच असल्याचे सांगितले.

त्यावरून पोलिसांनी टॅगवर असलेल्या कल्पना चौरे हिचा शोध घेतला असता, ती प्रसुती विभागात होती. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर साऱ्या प्रकाराचा उगलडा झाला. अखेर पोलिसांनीही सुटकेचा श्वास घेत कल्पना चौरे व तिचा पती जगन चौरे यांचा जबाब नोंदवून घेतला आणि पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली. अंमलदार चव्हाण यांनी तपास केला. (latest marathi news)

असा आहे प्रकार

कल्पना चौरे (रा. सौंदाणे परिसरातील वाडी, ता. सटाणा) यांना सातव्या महिन्यात प्रसुती कळा आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. ३) त्यांची प्रसुती झाली परंतु नवजात पुरुष जातीचे अर्भक मयत झाले. त्यामुळे प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतर त्यावर अंत्यविधी करण्यासाठी अर्भकाचा पिता जगन चौरे यांच्याकडे दिले.

आदिवासी समाजात मृतदेह पुरण्याची प्रथा आहे. त्यातही तो शहरात पहिल्यांदा आलेला. त्यामुळे त्यास स्मशानभूमी माहिती नसल्याने मयत अर्भकाला एकतर पुरावे तर जागा सापडली नाही. म्हणून नदीत सोडून देण्यासाठी तो गोदाघाटावर गेला आणि दुतोंड्या मारुतीजवळ पाण्यालगतच्या पायरीवर अर्भक सोडून निघून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT