Jyoti Pawar esakal
नाशिक

Nashik Inspirational Story : नियतीवर मात करीत ज्योतीताई बनल्या उद्योजिका!

Latest Women Empowerment News : पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारत पोळ्या तयार करण्याच्या कामातून उभे राहतानाच नाशिकमध्ये दिवसाकाठी बाराशे पोळ्यांची विक्री करणाऱ्या इंदिरानगरच्या ज्योतीताई पवार यांचा प्रवास खचलेल्या मनांसाठी उभारी देणारा ठरलाय.

विजयकुमार इंगळे

मुंबईत रिक्षाचालक असलेल्या पतीला आधार देण्यासाठी तिचीही धडपड सुरू होती. माहेरच्या परिस्थितीमुळे शिक्षणही अर्ध्यावरच सुटल्याने तिच्या नशिबी कष्टाशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत स्थिरावण्यासारखी परिस्थिती नसल्याने कुटुंबासह तिने नाशिकचा रस्ता धरला... नाशिकमध्ये स्थिर होण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नियतीनं कपाळावरचं कुंकू हिरावून नेलं... मुलीच्या भविष्यासाठी दुःख बाजूला सारत पुन्हा उभी राहिली.

तेराव्याच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच तिला हॉटेलसाठी पोळ्या तयार करून देण्याची ऑर्डर आली. पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारत पोळ्या तयार करण्याच्या कामातून उभे राहतानाच नाशिकमध्ये दिवसाकाठी बाराशे पोळ्यांची विक्री करणाऱ्या इंदिरानगरच्या ज्योतीताई पवार यांचा प्रवास खचलेल्या मनांसाठी उभारी देणारा ठरलाय. (Jyoti pawar became entrepreneur by overcoming destiny)

अहमदनगर जिल्ह्यातील नांदूर खंडाळा येथील माहेर असलेल्या ज्योती जितेंद्र पवार यांचे शिक्षण आठवी पास... मूळच्या नाशिकच्या सातपूर येथील असलेल्‍या ज्योतीताई यांचे वडील शशिकांत एकनाथ यलम यांचं पत्नी अंजनाबाई यांच्यासह दोन मुलगे, मुलगी असं छोटं कुटुंब होतं.

शेतीसह शशिकांत यलम श्रीरामपूर परिसरात पेंटरचा व्यवसाय करत होते. ज्योतीताईंच्या आई अंजनाबाई आणि आजी कुटुंबाला आधार देण्यासाठी रोजगार हमीच्या कामावर जाऊन कुटुंबाला हातभार लावत होत्या. कुटुंबाच्या रोजच्या भाकरीच्या लढाईत मुलांचंही शिक्षण सुटलं.

त्यामुळे आठवीत असतानाच ज्योतीताईंना शाळेकडे पाठ फिरवावी लागली. कुटुंबाचा भार कमी व्हावा, या उद्देशाने वडिलांनी ज्योतीताईंचा विवाह सातपूर परिसरातील जितेंद्र पवार यांच्याशी लावून दिला. जितेंद्र वाणिज्य शाखेचे पदवीधर होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना रोजगाराच्या शोधात थेट मुंबई गाठावी लागली होती.

मुंबईत बोरिवली परिसरात रिक्षाचालक म्हणून काम करत जितेंद्र कुटुंबाला आधार देत होते. मात्र रिक्षा व्यवसायातील अनियमित उत्पन्नामुळे त्यांनी डिस्ट्रिब्यूटरकडे नोकरी पत्करली. मात्र त्यातही जम न बसल्याने जितेंद्र यांनी ज्योतीताई आणि मुलगी जान्हवी यांच्यासह नाशिक गाठले.

इंदिरानगर परिसरात भाड्याच्या खोलीत बिऱ्हाड थाटलं. या भागातील गरज ओळखून ज्योतीताई यांनी परिसरात बिर्याणी तयार करून विक्री करण्याबाबतचा मनोदय पतीकडे बोलून दाखविला. ज्योतीताईंना प्रोत्साहन देत त्यांनी अवघ्या पाचशे रुपये भांडवलावर वस्तू घेऊन देत या परिसरात छोट्या टेबलावर बिर्याणी विक्री सुरू केली.

पहिल्याच दिवशी या व्यवसायातून तीनशे रुपयांची कमाई झाली. ज्योतीताईंना व्यवसायात मदत करतानाच जितेंद्र यांनीही फायनान्सकडून कर्ज घेऊन चारचाकी खरेदी करत प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी असल्याने कुटुंबावर आघात झाला. पोळी विक्रीतून जम बसवत असतानाच एका दुर्घटनेत पती जितेंद्र जग सोडून गेले. (latest marathi news)

त्या वेळी ज्योतीताईंची मुलगी जान्हवी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. समोर अंधार दिसत असतानाही त्या खचल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर पतीच्या तेराव्याच्या आदल्या दिवशी सातपूर येथील एका हॉटेलकडून तीनशे पोळ्या बनविण्याची ऑर्डर मिळाली होती. दुसऱ्या दिवशी पतीचा तेराव्याचा विधी असतानाही पतीनिधनाचं दुःख बाजूला सारत मुलीनं दिलेल्या पाठबळावर पोळ्यांची ऑर्डर पूर्ण करून देत आपलं काम सुरू ठेवलं.

नियतीलाच दिलं आव्हान...

आयुष्यातील आलेल्या परिस्थितीलाच आव्हान देत ज्योतीताईंनी जणू नियतीलाच आव्हान दिलं होतं. याच काळात कोरोना महामारी आली. मात्र ज्योतीताईंनी हार न मानता कोरोना काळातही महापालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयासाठी पोळ्या पुरवत परिसरातील महिलांसाठीही रोजगार उपलब्ध करून दिला.

पोळीविक्री व्यवसायातून आज दिवकासाठी हजार ते बाराशे पोळ्या स्वतः लाटून वेगवेगळ्या हॉटेल्सना पुरवठा करणाऱ्या ज्योतीताईंनी उद्योजिका म्हणून उभी केलेली ओळख नक्कीच महिलांसाठी अभिमान वाटावा अशीच आहे.

आयुष्यात आलेल्या प्रसंगांमध्ये खचून न जाता जिद्दीच्या जोरावर संकटांवर मात करताना मुलगी, जावई, दीर विजय पवार, माला पवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या माई बुचके यांच्यासोबतच येथील साई महिला मंडळांच्या सदस्यांनी दिलेला आधार मोलाचा असल्याचं सांगताना मात्र ज्योतीताईंना अश्रू आवरणं कठीण बनलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT