Collector Jalaj Sharma esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : 383 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक रद्द? जिल्हाधिकारी मागवू शकतात मार्गदर्शन

Lok Sabha Election : लोकसभेच्या एका मतदारसंघात ३८३ पेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास त्या मतदारसंघाची निवडणूक रद्द होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या एका मतदारसंघात ३८३ पेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास त्या मतदारसंघाची निवडणूक रद्द होऊ शकते. यासंदर्भात निवडणूक आयोगाने अद्याप कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. परंतु अशी परिस्थिती ओढावल्यास जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागविणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने जास्तीत जास्त उमेदवार उतरविण्याचा ‘गनिमी कावा’ करण्याचे ठरविले आहे. ()

यातून निवडणुकीचा पेच निर्माण होऊ शकतो. एका मतदारसंघात जास्तीत जास्त ३८३ उमेदवार निवडणूक लढवू शकतात. त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीत उतरल्यास त्या मतदारसंघाचा पेच वाढू शकतो. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांत होत आहे. नाशिक व दिंडोरीला २० मेस मतदान होणार असल्याने तत्पूर्वी इतर मतदारसंघांमध्ये या स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. (latest marathi news)

त्यांच्यासाठी निवडणूक आयोग काय निर्णय घेते, यावर इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी होईल. ऐनवेळी उद्‍भवणाऱ्या परिस्थितीनुरूप मार्गदर्शन मागविले जाणार असले तरी बॅलेट पेपरवर तत्काळ निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्या मतदारसंघाची निवडणूक तूर्त स्थगित करावी लागू शकते, अशी परिस्थिती उद्‍भवल्यास निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

''नाशिक व दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात इतर ठिकाणी मतदान होणार असल्याने तेथील परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. ऐनवेळी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागविले जाईल.''- जलज शर्मा, जिल्हाधिकारी (नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT