Garbage and liquor bottle lying in water tank premises. In the second photograph, GPO Jalakumbh. esakal
नाशिक

Nashik News : GPO जवळील जलकुंभ बनला टवाळखोरांचा अड्डा; ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्या

Nashik : महापालिकेच्या जीपीओ समोर असलेला जलकुंभ टवाळखोराचा अड्डा बनला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या जीपीओ समोर असलेला जलकुंभ टवाळखोराचा अड्डा बनला आहे. आवारात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्या पडल्या असून मनपा प्रशासनाकडून याठिकाणी स्वच्छता केली जात असल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे याठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून येथील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. (Nashik Jalkumbh near GPO has became haven for criminal marathi news)

जीपीओ परिसरातील जलकुंभचा परिसर एकीकडे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असताना दुसरीकडे या नियमास तिलांजली देत जलकुंभ आवारात सर्रास टवाळखोरांचा वावर असतो. येथे रात्री जुगाराचे डाव, मद्याच्या पार्ट्या होतात. तसेच याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने याठिकाणी भिकारी देखील याठिकाणी येत नशा करतात.

याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस जीपीओ जलकुंभ आवारात दुरावस्था वाढत आहे. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून नावालाच उरला आहे. जीपोआला संरक्षण भिंत नसल्याने परिसरातील नागरिकही आवारात कचरा फेकतात. येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून आहे.

त्यामुळे आवारास बकाल स्वरूप तर आलेच आहे दुर्गंधीही वाढली आहे. पाणीपुरवठा महापालिकेकडून याकडे लक्ष देत आवाराची स्वच्छता करावी. टवाळखोर आणि भिकाऱ्यांना आवारात येण्यास प्रतिबंध करावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

संरक्षण भिंत नसल्याने सुरक्षा रामभरोसे

जलकुंभ आवारास एका बाजूस संरक्षण भिंत नाही. अन्य बाजूची संरक्षण भिंतीची तुटपुट झाली आहे. तसेच या भिंतीची उंचीही कमी असल्याने टवाळखोर सर्रास आवारात प्रवेश करत असतात. तसेच मद्पी अन्य नागरिकांनाही पार्ट्या करण्यासाठी आवार उपलब्ध होत असतो. नागरिकांना कचरा फेकण्यास सोय होते. त्यामुळे रान गवत वाढून बकाल स्वरूप आले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT