Admission  esakal
नाशिक

Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

Nashik News : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता अकरावी प्रवेशाची ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पहिल्‍या फेरीची प्रक्रिया सोमवारी (ता. १) पूर्ण झाली. पहिल्‍या नियमित फेरीसाठी दहा हजार ८३१ विद्यार्थ्यांची निवड झालेली असताना प्रत्‍यक्षात सहा हजार ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. बुधवार (ता. ३)पासून दुसऱ्या नियमित फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. (Junior College Admission of 6 thousand students in first round)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता अकरावी प्रवेशाची ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्याअंतर्गत पहिल्‍या फेरीची गुणवत्तायादी प्रसिद्ध केल्‍यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिली होती. पहिल्‍या फेरीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्‍यामुळे उपलब्‍ध असलेल्‍या एकूण जागांच्‍या तुलनेत साधारणतः पंचवीस टक्‍के जागांवर प्रवेश निश्‍चित झाले आहेत.

उर्वरित ७५ टक्‍के जागा अद्यापही रिक्‍त असून, यामुळे विद्यार्थी व पालकांचे दुसऱ्या व तिसऱ्या नियमित फेरीकडे लक्ष लागून राहणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीअंतर्गत इच्‍छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाखा पसंतीसाठीचा अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत बुधवार (ता. ३)पासून शनिवार (ता. ६)पर्यंत असणार आहे. (latest marathi news)

त्यानंतर माहिती विश्‍लेषणासाठी ७ ते ९ जुलैदरम्‍यान राखीव कालावधी राहील. दुसऱ्या फेरीची निवडयादी १० जुलैला सकाळी दहाला प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

पहिल्‍या फेरीतील शाखानिहाय

प्रवेशित विद्यार्थ्यांची स्‍थिती

विज्ञान ------ दोन हजार ७२०

वाणिज्य---- दोन हजार ३३०

कला --------- ९५६

एचएसव्‍हीसी --- ७३

एकूण ------- सहा हजार ७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT