Samrudhh Mogul
Samrudhh Mogul esakal
नाशिक

Nashik Kala Katta : नाशिकचे सौंदर्यवादी, कल्पक छायाचित्रकार समृद्ध मोगल

सकाळ वृत्तसेवा

"एखाद्या कलेचे दर्शन घेता आले तरच त्या कलेच्या प्रदर्शनाचे मर्म त्या कलाकाराला समजू शकते. प्रदर्शनाच्या टप्प्यापर्यंत पोचलेली छायाचित्रे ही पाहायची असतात की वाचायची असतात, असा प्रश्न जर कुणी मला विचारला तर मी अनुभवाने सांगेल की, प्रकाशाचा प्राण ओळखून काढलेली छायाचित्रे ही बघता बघता वाचताही नक्कीच येतात.

नाशिकचे सौंदर्यवादी छायाचित्रकार समृद्ध मोगल यांच्या कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्रे बघताना अगदी हाच अनुभव येतो. दृष्टी हेच कलाकाराचे माध्यम, साधन, आणि ओळखही असते. हे आपल्या छायाचित्रांतून सिद्ध करणारे समृद्ध मोगल ‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, फोटोग्राफीची कला ही कॅमेरा हाताळण्याचे तंत्र आणि शोधक वृत्तीचा ध्यास यांचे संतुलित मिश्रण आहे.

आधी विषय शोधता आला पाहिजे, मग तो बघता आला पाहिजे आणि नंतर तो मांडताही आला पाहिजे. छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ समजावून घेऊन, कॉम्पोझिशन आणि टायमिंग यांची उत्तम सांगड घालून टिपलेले छायाचित्र हे वास्तववादी तर असतेच, पण त्या वास्तवाचे सौंदर्य खुलविणारा तो एक अविस्मरणीय क्लिक ठरतो." - तृप्ती चावरे- तिजारे

(Nashik Kala Katta aesthetic creative photographer samrudhh mogul from Nashik news)

बालवयातच समृद्धजींची या क्षेत्रात एंट्री झाली, तीच मुळी डार्क रूममध्ये. या अंधारखोलीत, त्यांचे आजोबा हनुमंतराव मोगल यांच्या साक्षीने गिरविलेला फोटोग्राफीचा पहिला संस्कार त्यांना खऱ्या अर्थाने ‘समृद्ध’ करून गेला.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या जगविख्यात कला महाविद्यालयातून पदवी घेणारी त्यांची ही तिसरी पिढी असून समृद्धजी एक ख्यातनाम प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट म्हणूनही सर्वपरिचित आहेत. २०१४ साली, जहाँगीर आर्ट्स गॅलरी मुंबई येथे लाइट ॲन्ड शॅडोज इन आर्किटेक्चर या विषयावर त्यांच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन भरविले होते.

प्रदर्शनास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांना मुक्त फोटोग्राफीचे एक नवे आकाश गवसले. त्यांनी स्वतःची व्हिज्युअल आर्ट्स कन्सल्टन्सी सुरू केली. सौंदर्यदृष्टीतून विकसित केलेले फोटोग्राफ्स योग्य आकारात, योग्य जागी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे, कसे खुलून दिसतील व त्यामुळे त्या जागेचे सौंदर्य कसे वाढेल अशी त्यांची या मागची भूमिका आहे.

त्यांची छायाचित्रे चित्रे ही अनेक वास्तूंची सौंदर्यशोभा वाढविणारी कला म्हणून सर्वत्र गौरविली गेली. स्वतःच्या दृष्टीनुसार दिसणाऱ्या दृश्याला एक संज्ञा, एक परिभाषा देणारा कलाकाराचा विचार काय असतो ते समृद्धजींची फोटोग्राफी पाहून समजते.

तंत्रज्ञान आणि कला यांचा अचूक मेळ साधत, विचार आणि तर्क यांच्या पलीकडे जात, आपल्या कॅमेऱ्याची अनोखी कमाल दाखवणारी त्यांची फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रांची चालती बोलती कादंबरीच.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ती रेखाटताना ते तरुण पिढीला संदेश देतात की, आजकाल कॅमेरा हा प्रत्येकाच्या खिशात आहे पण तो फक्त सेल्फी मोडवर वापरावासा वाटणे हे आजच्या पिढीचे दुर्दैव आहे. मोबाईलमधे दोनशे सेल्फी असतील पण एखादेही कॉम्पोझिशन नसेल तर आपण नेमके कुठे चाललो आहोत असा प्रश्न पडला पाहिजे.

‘बियॉंड सेल्फी, देअर आर सो मेनी थिंग्ज ज्याला ओळखता येईल त्याचेच आयुष्य सुंदर, प्रगल्भ आणि समृद्ध होऊ शकेल.

शांतता फोटोग्राफीमध्ये दिसावी

आपल्याला दिसते काय त्याहीपेक्षा जास्त आपण बघतो काय व बघितलेले अनुभवतो कसे हे महत्त्वाचे आहे. निसर्गात एखाद्या झाडाखाली निवांत बसावे. आजूबाजूच्या शांततेचा अनुभव घ्यावा आणि ती शांतता फोटोग्राफीमध्ये दिसावी असा प्रयत्न केला पाहिजे.

समोर दिसणारे दृश्य आणि हातात धरलेला कॅमेरा यातील संवादाच्या मधोमध एक भाषा दडलेली असते, भाषेच्या त्या प्रवासामागे काही तरल मनखुणा आणि मवाळ हळव्या आठवणीही असतात, परिपूर्ण कलाकृतींची जणू ती नांदीच सुरू असते.

समृद्धजींच्या फोटोग्राफीमधून ही नांदी ऐकू येते. या नांदीतून तरळणारी त्यांची जगावेगळी छायाचित्रे नाशिकच्या कलाभूमीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवतील यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT