nashik kalyan local esakal
नाशिक

नाशिक- कल्याण लोकलचा विषय बारगळला

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिकच्या (nashik kalyan local) सर्वांगीण विकासाला चालना देणारी प्रस्तावित नाशिक- कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलचा विषय लॉकडाउनदरम्यान मागे पडला आहे. लवकरात लवकर या मेमू लोकलची चाचणी घेऊन ही लोकल रुळावर आणण्याची मागणी नाशिककर प्रवाशांनी केली आहे. बहुप्रतिक्षित नाशिक- कल्याण लोकल रेल्वेसेवेला लाल कंदील दाखविण्यात आला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली नाशिक- कल्याण लोकल मागे पडली. निवडणुका झाल्यावर नवीन मेमू लोकलचा घाट घातला गेला. लोकल ही संकल्पना रद्द करून मेमू लोकल चालवणार असल्याची अंतिम घोषणा रेल्वेने केली आहे. आता या मेमू लोकलची चाचणी लवकर होण्याची अपेक्षा होत आहे. (Nashik-Kalyan-local-issue-of-was-raised-nashik-marathi-news)

मेमू लोकलची चाचणी लवकर होण्याची अपेक्षा

नाशिक- कल्याण लोकलचा गाजावाजा झाला. लोकल सुरू होणार म्हणून नाशिकहून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी उत्सवही साजरा केला. खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत मागणी केल्यामुळे लोकल मंजूर झाली. ३२ कोटी रुपये खर्चून तयार केलेली ही लोकल कुर्ला कारशेडला येऊनही ठेवली. अंतर्गत तांत्रिक रचना अद्ययावत करून ही लोकल धावणेयोग्य तयारही करण्यात आली. या लोकलच्या टेस्टिंगसाठी नऊ लाख रुपये मंजूरही झाले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत विषय मागे राहिला.

चातकासारखी वाट

नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आहेत. यामध्ये मेमू लोकलची अधिक भर पडणार होती. नाशिककर या गाडीची चातकासारखी वाट पाहत आहे. रेल्वेमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना प्रशासनाला साकडे घालणार आहे. यासंबंधी रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी वेळोवेळी रेल्वे खात्याशी पत्रव्यवहार केला आहे.

सर्वांगीण विकासात भर

रेल्वे विभाग नाशिक- कल्याण लोकल चालविण्यासाठी धजावत नाही. यामुळे नाशिककरांची मोठी अडचण होत आहे. मेमू लोकल सुरू झाल्यावर कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासात भर पडणार आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांना फायदा होणार आहे. -वामन सांगळे, रेल्वे इंजिनतज्ज्ञ

लोकल सुरू झाल्यास नाशिककरांना नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी सोयीचे होणार आहे. शेतकऱ्यांना माल मुंबईला नेणे सोयीचे होईल. याशिवाय नाशिक- मुंबई कनेक्शन वाढल्यामुळे नाशिकच्या विकासाला संधी मिळणार आहे. त्यामुळे ही हायटेक सेवा नाशिककरांना मिळावी, हीच अपेक्षा. -दिनेश निकाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प खोटारडे! एका तासात ७ वेळा खोटं बोलले; इराण म्हणाले, वायफळ चर्चा, तोडगा निघणार नाही

खरात अन् अयान किरकोळ! त्याहून मोठं कांड, ५०० महिलांचे VIDEO अन् ब्लॅकमेलिंग, कुठं घडला प्रकार?

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

SCROLL FOR NEXT