baby sakal
नाशिक

नाशिक : कर्मचाऱ्याच्या मारहाणीने बाळाचा मृत्यु

जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्याने प्रसूत महिलेला मारहाण केल्याने तिच्या बाळाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा


नाशिक : जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्याने प्रसूत महिलेला मारहाण केल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची तक्रार पीडित मातेच्या कुटुंबाने पोलिस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरु केली. दरम्यान, आज संबधित आरोग्य कर्मचाऱ्यावरील कारवाईच्या मागणीसाठी तब्बल आठ तास बाळाचा मृतदेह तसाच पडून होता.

यानिमित्ताने, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी (ता.९) पेठ येथून पहाटे चारला ही महिला प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. पोटात कळा सुरु झाल्यानंतर ती स्वच्छतागृहात जात असतांना सफाई कर्मचाऱ्याने तिला अडविले. वादानंतर तिला शिवीगाळ करीत भिंतीवर ढकलले. त्यामुळे ती खाली पडून पोटाला मार लागला. त्यानंतर दोन दिवसांनी सकाळी प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरही उपस्थित नव्हते. अशा हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला.

त्यातच बाळाचा मृत्यु झाला असा पीडित महिलेचा व तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. पिडीत मातेच्या कुटुंबाने यासंदर्भात बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना तसेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधितांवर कारवाई करा : श्रमजीवी संघटना

वाडीवऱ्हे : प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल महिलेस अमानुष मारहाण केल्याने बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यावर व बाळंतपणावेळी गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर करवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष अर्जुन भोई, कैलास गारे, अरुण चौधरी, प्रदीप माळेकर, किसन देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

प्रसूतीदरम्यान बाळ जोरात खाली पडले आणि त्याच्या डोक्याला जोरात मार लागला. मातेला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. ग्रामीण भागातील आदिवासी गरीब, कष्टकरी रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी यावे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे.

-हिरा गारे, पीडित, पेठ, जि. नाशिक

संबंधित प्रकारात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांत चौकशीचा अहवाल येईल. चौकशी अहवाल आल्यानंतर त्याविषयी कारवाई केली जाईल.

-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी IAS अधिकाऱ्याला अटक, ११९८ पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा होता आरोप

Sindhuratna Yojana 2.0 : परशुराम मंदिर ते गोवळकोट किल्ला! चिपळूणमधील 'या' प्रमुख पर्यटनस्थळांचा होणार कायापालट, स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या मोठ्या संधी

Navratri Day Four: आज नवरात्रीची चौथी माळ; धन-संपत्तीसह आरोग्याचे वरदान देणाऱ्या कुष्मांडा मातेची पूजा! पाहा नैवेद्य अन् मंत्र...

Maharashtra Live News : उघड्या चेंबरमध्ये पडला चिमुकला ; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

EMI Rule: मेडिकल इमर्जन्सी किंवा पगार उशिरा आल्याने EMI चुकली? बँकेचे हे नियम माहीत आहेत का?

SCROLL FOR NEXT