Export of mangoes from Lasalgaon .  esakal
नाशिक

Nashik Mango News : यूएसए, ऑस्ट्रेलियाला 1 हजार टन आंबा निर्यात; कोकणचा हापूसही कृषक विकिरण केंद्रातून विदेशात

Nashik News : जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून ९ जूनपर्यंत १ हजार टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंकृषक केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिल पासून आंबा निर्यातीला सुरवात झाली असून १ हजार टन आंबा हा यूएसएला आणि ऑस्ट्रेलिया येथे निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषक चे अधिकारी संजय आहेर यांनी सकाळ ला दिली. (Export of 1 thousand tons of mangoes to USA Australia)

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून ९ जूनपर्यंत १ हजार टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.

मागील वर्षी देखील १ हजार २३ टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहेत. (latest marathi news)

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

वर्ष निर्यात (टन)

२०१८ ५८०

२०१९ ६८५

२०२२ - ३५०

२०२३ -१०२३

२०२४ -१०००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT