Jaydutt Holkar and office bearers welcoming newly elected Sarpanch Padi Afzal Bhai Shaikh esakal
नाशिक

Nashik News : लासलगावला सरपंचपदी अफजल शेख; मुस्लिम समाजाला 74 वर्षानंतर सरपंचपदी संधी

Nashik News : लासलगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी अफजल नसीर शेख यांची निवड झाली.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : येथील ग्रामपंचायत सरपंचपदी अफजल नसीर शेख यांची निवड झाली. मंगळवारी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सर्कल भाऊसाहेब देवकाते, तलाठी नितीन केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत अफजल शेख यांना ९ मते मिळाले तर प्रतिस्पर्धी गटाचे चंद्रशेखर होळकर यांना ८ मते मिळाली. (Sarpanch opportunity for Muslim community after 74 years in Lasalgaon)

मुदत संपल्यानंतर जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील गटाचे सरपंच होणार असल्याने निवडणूक झाली. सरपंच पदासाठी होळकर पाटील गटाचे अफजल शेख तर कल्याणराव पाटील, डिके जगताप गटाचे चंद्रशेखर होळकर यांच्यात निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी पाटील गटाचे दोन सदस्य विरोधी गटाला मिळाल्याने त्यांचे संख्याबळ नऊ झाले.

लासलगावला १९४५ ते १९४८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी चांद खां पठाण तर त्यानंतर १९५० पर्यत मोहम्मद दादामिया शेख सरपंच होते. त्यानंतर तब्बल ७४ वर्षानंतर प्रथमच मुस्लिम समाजाला अफजल शेख यांच्या रुपाने सरपंचपदाचा मान मिळाला. (latest marathi news)

ग्रामसेवक लिंगराज जंगम, नानासाहेब पाटील, जयदत्त होळकर, सुवर्णाताई जगताप, संगीता पाटील, सायली पाटील.

योगीता पाटील, अमोल थोरे, चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, सुवर्णाताई जगताप, रेवती होळकर, रामनाथ शेजवळ, पुष्पा अहिरे,दत्ता पाटील, अमिता ब्रम्हेचा, ज्योती निकम, अश्विनी बर्डे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 16 Pro ची किंमत अचानक कोसळली; मिळतोय चक्क 50 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची रांग, इथे सुरुय ऑफर..

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गर्जना ! 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई सिनेमामधून

Ind vs WI 2nd Test : कुलदीप यादवच्या चक्रव्यूहमध्ये फसला वेस्टइंडीज; २४८ धावांवर ऑलआऊट, फॉलोऑनची नामुष्की

Mumbai BMC: छटपूजा उत्‍सवासाठी पालिकेची योजना; मेट्रो, बेस्टसह इतर सुविधांचा विस्तार करणार

Pune Farmers : पुण्यातील पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT