Vijay Karanjkar hemant godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : करंजकरांच्या उमेदवारी अर्जाने महाविकास आघाडीत धडकी; महायुतीचीही डोकेदुखी वाढणार

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या उबाठा गटाकडून इच्छुक असलेले लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत धडकी भरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या उबाठा गटाकडून इच्छुक असलेले लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत धडकी भरली आहे. परंतु दुसरीकडे करंजकर यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास देवळाली कॅम्पसह नाशिक तालुक्यातील गोडसेंच्या मतांवर देखील परिणाम होण्याची भिती असल्याने महाविकास आघाडी बरोबरच महायुतीसाठी देखील करंजकर यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे. (last day to file nomination papers for Nashik Lok Sabha Constituency )

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. गुरुवार (ता. २) पर्यंत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला अर्थात भाजपच्या भारती पवार यांना जसे माकपचे जे. पी. गावित व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले.

त्याचप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्येदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे यांच्यासाठी अडचणीची ठरणारी बाब घडली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटकपदाची जबाबदारी सोपविलेले विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. करंजकर यांच्या अर्जामुळे महाविकास आघाडीमध्ये धडकी भरली आहे.

करंजकर यांना उबाठा गटाकडून उमेदवारी हवी होती. गेल्या वर्षभरापासून त्यांनी सिन्नर, इगतपुरी व नाशिक तालुक्यात प्रचाराचा धडाका लावला होता. मात्र ऐनवेळी करंजकर यांचा पत्ता कट करून त्यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार पराग वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे करंजकर हे नाराज होते. शिवसेनेच्या उबाठा गटाच्या कार्यक्रमांकडे करंजकर यांनी पाठ फिरविली. (latest political news)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही विजय आपलेच असे सांगून शिवसेनेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु करंजकर यांनी भूमिका कायम ठेवल्याने एक बाजू लंगडी पडत गेली. महायुतीकडून उमेदवार जाहीर न झाल्याने करंजकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील प्रयत्न करून बघितला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांचे नाव लावून धरले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील पाचही आमदारांना फोन करून आता प्रयोग करण्याची वेळ नाही.

त्यामुळे गोडसे यांना सांभाळून घ्या अशी विनवणी केली. एक मे रोजी घोषणा झाल्यानंतर लगेचच दोन मे रोजी गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे करंजकर यांचे राजकीय पक्षांकडून उमेदवारीचे सर्व मार्ग बंद झाले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे करंजकर यांना मानणारा शिवसेनेच्या उबाठा गटातील मतदार त्यांच्या मागे जाण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीसाठी करंजकर यांची उमेदवारी धडकी भरवणारी ठरू शकते.

महायुतीसाठीही डोकेदुखी

करंजकर हे उबाठा गटाचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महाविकास आघाडीला झटका दिल्याचे बोलले जात असले तरी करंजकर यांचे कार्यक्षेत्र व नातेवाईकांचा गोतावळा लक्षात घेता महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी देखील मोठी डोकेदुखी आहे. करंजकर यांचे जे नातेवाईक आहेत, तेच नातेवाईक गोडसे यांचे देखील आहे.

त्यामुळे नातेवाईकांमध्ये सरळ दोन गट पडतील असे दिसते. त्याचबरोबर करंजकर यांचे कार्यक्षेत्र भगूर, देवळाली कॅम्प, राहुरी, दोनवाडे, विंचूर गवळी या भागात आहे. त्याच भागात गोडसे यांचेही कार्यक्षेत्र अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात देखील मत विभागणी अटळ राहणार असल्याने त्या भागापुरती महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT