leopard rescue operation esakal
नाशिक

Nashik Leopard News : भक्ष्यासह बिबट्या विहीरीत; 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या सुखरूप बाहेर

Nashik News : दिवसभरात मोठी कसरत करुनही बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले नसल्याने नाशिकहून वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले होते.

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील भिलवाड येथे भक्ष्याचा पाठलाग करणे बिबट्याच्या चांगलेच अंगलट आले आणि भक्ष्यासह बिबट सत्तर फुट विहिरीत पडला. सबंधित शेतकऱ्याला विहिरीत बिबट पडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ताहाराबाद वनपरिक्षेत्रात माहिती दिली.

मात्र दिवसभरात मोठी कसरत करुनही बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले नसल्याने नाशिकहून वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले होते.  (Nashik Leopard in well with prey After 2 days out safely)

मांगुलाल धवळू ठाकरे यांच्या शेतातील गट क्रमांक ११७ (ब) बुधवार (ता.१७) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट भक्ष्य (कोंबडी) पाठलाग करीत असताना विहिरीत पडला. सकाळी सदर शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडलेला निदर्शनास आला.

श्री. ठाकरे यांनी ताबडतोब ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. सकाळी साडेनऊच्या सुमारास ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनपाल तुषार देसाईसह माणिक मोरे, आकाश कोळी, निलेश कोळी व अन्य कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शेतात दाखल झाला.

तत्पूर्वी विहिरीजवळील बिबट्याला पाहणाऱ्यांची गर्दी मोकळी केली. स्थानिकांच्या मदतीने दोरखंड व बाज (खाट) विहिरीत सोडण्यात आली होती मात्र विहिर खोल असल्याने बिबट्या विहिरीबाहेर काढणे कर्मचाऱ्यांना जिकिरचे ठरत होते. यावेळी सहाय्यक वनरक्षक शेखर तनपुरे व वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. (latest marathi news)

दिवसभर वनकर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले मात्र बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले नव्हते रात्र झाल्याने दुसऱ्या दिवशी गुरूवार (ता.१८) पुन्हा वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबण्यासाठी थेट नाशिक येथील वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते.

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. विहिरीत पिंजरा टाकण्यात आला होता. अखेरीस काही तासांतच बिबट पिंजऱ्यात अलगद अटकला होता. स्थानिकांच्या मदतीने पिंजरा विहिरीतून बाहेर काढण्यात यश आल्याने स्थानिकासह वनकर्मचाऱ्यांनी निश्वास सोडला.

बिबट्याला पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांच्या निगराणीत औषधोपचारांसाठी ठेवण्यात आले असून पुन्हा त्याला त्याच्या आदिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. या रेस्क्यू ऑपरेशन टीममध्ये वन्यजीव बचाव पथकाचे वैभव, अभिजित महाले, सहाय्यक वनरक्षक शेखर तनपुरे ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणेसह कर्मचारी तळ ठोकून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT