Litchi  esakal
नाशिक

Nashik News : शरीराची उष्णता संतुलित राखते लालचुटूक लीची; मालेगावात मोठी मागणी

Nashik News : शरीरातील उष्णता संतुलीत करण्यासाठी बिहारची लिची येथील बाजारात दाखल झाली आहे. एक ते दीड महिना लिची विक्रीसाठी असणार आहे.

जलील शेख

मालेगाव : सध्या वाढत्या उष्णतेने सर्वच जण होरपळून जात आहेत. शहर व परिसरात तापमान कमी होण्याचे नाव घेत नाही. तीन महिन्यापासून सलग मालेगाव शहर व कसमादे परिसर उष्णतेच्या झळा सोसत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक जण घरी चिंचेच्या पाण्यात गूळ टाकून वापर करीत आहेत. शीतपेय व थंडगार पाणी पिताना दिसत आहेत. (Litchi from Bihar entered market to balance heat in body)

शरीरातील उष्णता संतुलीत करण्यासाठी बिहारची लिची येथील बाजारात दाखल झाली आहे. एक ते दीड महिना लिची विक्रीसाठी असणार आहे. त्यामुळे उष्णता संतुलीत राहण्यासाठी अनेक जण लिची खरेदी करीत आहेत. व्यावसायिक लिची विक्री करताना त्याचे फायदे ग्राहकांना पटवून देत आहेत. शहरात लिची विक्रीला मागणी वाढत आहे.

येथे पश्‍चिम बंगाल, बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातून लिची येत आहे. १० जूनपर्यंत लिची बाजारात विक्रीसाठी दिसेल. रोज ५०० ते ६०० किलो लिची विकली जात आहे. ८० रुपयाला पाव किलो तर ३२० रुपये किलोने येथे लिचीला भाव मिळत आहे. शहरात वाढते तापमान अनेकांचे डोकेदुखी ठरले आहे.

तापमानापासून बचाव व्हावा यासाठी अनेकजण घरात लिची वापरताना दिसत आहे. बाजारात काही नागरीकांना हे फळ माहीत नसल्याने आवर्जून लिची विक्रेत्यांना विचारणा करून माहिती देत आहेत. लिचीमधून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असल्याने ते खाण्यास गोड आहे. त्यामुळे अनेक जण लिचीला पसंती देतात. शहरात मोहम्मद अली रोड, एकात्मता चौक, किदवाई रोड, सोमवार बाजार, मोसम पूल, सरदार मार्केट यासह विविध ठिकाणी हातगाड्यांवर लिची विक्रीस दिसत आहे. (latest marathi news)

लिची गुणकारी

लिची उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलीत राहते. लिचीमध्ये भरपूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन, ॲन्टी ऑक्सिडेंट राहतात. पोटॅशियम, व्हिटॅमिन सी यासह विविध घटक असतात. तसेच हृदयरोग व मधुमेह असलेल्या रुग्णांना लिची ही गुणकारी व लाभदायी आहे.

"लिची खाल्ल्याने शरीराला अनेक घटक मिळतात. यात फायबरचे प्रमाणही भरपूर असते. वर्षातून एकदा येणाऱ्या लिचीची प्रत्येकाने चाखावी. लहान मुलांनाही आवडेल." - डॉ. संदीप ठाकरे, बालरोगतज्ज्ञ, मालेगाव

"गेल्या वीस वर्षापासून लिची हा सिजनेबल व्यवसाय करीत आहे. लिचीला शहरात चांगली मागणी असते. लिचीचे सिजन संपल्यानंतर फणस विक्री करणार आहे." - इस्माईल शेख, घाऊक व्यापारी मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT