Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेसाठी महायुतीचे 3 पर्याय; इच्छुक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची घालमेल सुरु

Lok Sabha Constituency : राज्यात लोकसभेच्या जवळपास सर्वच जागांचे चित्र स्पष्ट होत असताना नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय मात्र महायुतीच्या चारही पक्षांकडून वेटींगवर ठेवण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Lok Sabha Constituency : राज्यात लोकसभेच्या जवळपास सर्वच जागांचे चित्र स्पष्ट होत असताना नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय मात्र महायुतीच्या चारही पक्षांकडून वेटींगवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही महायुतीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल याबाबत निश्‍चितता नाही. परंतु नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीकडून तीन पर्याय निश्‍चित करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्या तीन पर्यायातून कुठलाही एक पर्याय अंतिम होवू शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली. (nashik Lok Sabha Constituency 3 options of Grand Alliance for Nashik seat marathi news)

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशी सरळ लढत आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाला परंतु अद्यापही महायुती मधील जागेचा तिढा सुटत नाही. शिवसेनेचा पांरपरिक मतदार असल्याने शिंदे सेनेला नाशिकची जागा हवी आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील दावा केला आहे.

तर धार्मिक शहर, तीन आमदार व महापालिकेतील सत्तेमुळे नाशिकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यानंतर नाशिकमधील वातावरण ढवळून निघाले. भाजपने तुर्त ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत जागेची स्पर्धा सुरु आहे.

अद्यापही जागा निश्‍चिती होत नसल्याने महायुतीच्या इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची घालमेल सुरु आहे. जागेचा तिढा वाढत असताना महायुतीकडून तीन पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ऐनवेळी तीनपैकी एक पर्याय निश्‍चित करून जाहीर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यास सांगून वाद निर्माण होवू न देण्याची खेळी महायुतीच्या नेत्यांकडून खेळली जावू शकते.  (latest marathi news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच जागा

पर्याय १- साताऱ्याची जागा भाजपला दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच नाशिकची जागा देवून त्यातही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवार उभे करण्याचे नियोजन आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यामागे राज्यात ‘माधवं पॅटर्न’ राबविण्याचे भाजपचे धोरण आहे.

शिंदे सेनेलाच जागा

पर्याय २ - उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिंदे गटाकडे एकही जागा नाही. नाशिकमध्ये ताकद असल्याने व मागील दहा वर्षे खासदार शिवसेनेचाच असल्याने नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेला संधी द्यायची. शिवसेनेचाही तोच आग्रह आहे.

ऐनवेळी भाजपलाच जागा

पर्याय ३ - राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना (शिंदे गट) मध्ये नाशिकच्या जागेवरून स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतून महत्वाकांक्षा टोकाला गेल्यास ऐनवेळी भाजपकडून देखील नाशिकच्या जागेवर उमेदवार दिला जाईल. नाशिकच्या बदल्यात दिंडोरी, धुळे या लोकसभेच्या जागा एकतर राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेनेला सोडल्या जातील. दिंडोरी व धुळ्यात भाजपने उमेदवार जाहीर केल्याने या दोन्ही जागा सोडण्याची शक्यता फारच धुसर असली तरी ऐनवेळी काहीही होवू शकते अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT