Lok Sabha Constituency 
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : 20 मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा! भुजबळांचा उपरोधिक सल्ला

Lok Sabha Constituency : राज्यातील काही लोकसभा मतदारसंघापैकी नाशिकच्या उमेदावारीचा तिढा महायुतीमध्ये अद्याप तरी सुटलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : राज्यातील काही लोकसभा मतदारसंघापैकी नाशिकच्या उमेदावारीचा तिढा महायुतीमध्ये अद्याप तरी सुटलेला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतील सर्वच घटकपक्षांचे प्रमुख मेटाकुटीला आल्याचे रविवारी (ता. २८) स्पष्ट झाले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना या संदर्भात रविवारी माध्यमांनी विचारले असता, २० मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला. ( Bhujbal ironic advice of Announced candidates )

मात्र लगेचच सारवासारव करत उमेदवारीचा निर्णय झाल्यानंतर ताकदीने महायुतीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहून विजय करून आणू, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. भुजबळ फार्म येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. २० मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा, असे सांगतानाच आता अर्ज भरायला सुरवात झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याची खंत त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.

‘मला वाटले, की माझ्यामुळे उमेदवारी अडली असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल. तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सर्व ताकदीने कामाला लागू, निश्चितपणे महायुतीचा उमेदवार नाशिकमधून निवडून आणू.’ असे श्री. भुजबळ म्हणाले. प्रकाश शेंडगे यांच्या वाहनावरील हल्ल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की शेंडगे यांच्या वाहनावर हल्ला झाला असेल तर तो चुकीचा आहे.

ते ओबीसी चळवळीचे नेते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. कोणाला भीती दाखवून हल्ला करून घाबरवण्याचे प्रकार होता कामा नये. उमेदवाराने हल्ला केला नसेल. परंतु मधले काही कार्यकर्ते असतात. त्यांच्याकडून असे प्रकार होतात. पोलिसांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे. .(Nashik Political News)

भुजबळ यांनी घाबरून नाशिकमधून माघार घेतल्याचा आरोप होत आहे, त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. माझी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याने मी माघार घेतली. माझ्यामुळे पक्षांमध्ये किंवा इच्छुकांमध्ये जर कोणाची अडचण होत असेल, तर मी दूर होतो, लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी माझी भूमिका होती.

घाबरण्यासाठी मी माघार घेतली नाही. ओबीसींची एवढी मोठी लढाई लढलो. माझ्यावर अनेकदा हल्ले झाले, त्या वेळी घाबरलो नाही. आता काय घाबरणार. कितीवेळा दादागिरी, शिवीगाळ झाली, मात्र कधी घाबरलो नाही. महायुती अडचणीत येईल असे कुठेही वागू नये’’, असे आपण समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मतदानावेळी सहानुभूती बाजूला

एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लाट असल्याचा उल्लेख आला, त्यावर बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही. लाट शब्द माझ्या तोंडात घातला गेला. सहानुभूतीपेक्षा देशाचे खंबीरपणे नेतृत्व कोण करू शकते, हा विचार लोक मतदानावेळी करतात. मोदी यांचे खंबीर नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाकडे बघून लोक मतदान करतील. मतदानाच्या वेळेस सहानुभूती लोक बाजूला ठेवतात, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT