MLA Gopichand Padalkar visiting senior leader Chhagan Bhujbal at his residence. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : आमदार पडळकर यांनी घेतली भुजबळ यांची भेट!

Lok Sabha Constituency : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. छगन भुजबळ महायुतीतील सर्वांत महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी चळवळ वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ यांचे नाव समोर आले होते. ( MLA Gopichand Padalkar met Chhagan Bhujbal)

परंतु भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतरही उमेदवारी जाहीर होत नसल्याने अखेर त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन माघार घेतली होती. अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महायुती म्हणून असा प्रचार दिसून आला नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आदींनी भुजबळ यांची भेट घेतली. (latest marathi news)

रविवारी (ता. १२) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सकाळी भुजबळ यांची भेट घेतली. श्री. पडळकर म्हणाले, की नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेहमेळावा होता, यानिमित्त नाशिकमध्ये आलो होतो, महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आमचे नेते आहेत. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून ही भेट झाली.

छगन भुजबळ यांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. स्वतः भुजबळ यांनीच मी निवडणूक लढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे ओबीसींची ताकद जी होती तीच आज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT