Lok Sabha Constituency , nitesh rane
Lok Sabha Constituency , nitesh rane esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नीतेश राणे यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले; भाजप पदाधिकारी, संघ परिवारात आश्चर्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : भाजपचे युवा आमदार आणि हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडणारे नीतेश राणे यांना भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. विशेष म्हणजे या यादीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, राणे यांचे नाव वगळल्याने भाजपचे नेते, पदाधिकारी आणि विशेषतः संघ परिवारात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nashik Nitesh Rane dropped from list of star campaigners )

नीतेश राणे यांनी गेल्या दोन वर्षांत हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली आवाज उठविला. नगर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मांतरण, काही विशिष्ट ठिकाणी मुस्लिम धर्मियांकडून निर्माण केली जाणारी धार्मिक तेढ अशा असंख्य प्रकरणांत नीतेश राणे यांनी पुढाकार घेत ही प्रकरणे वेळोवेळी थेट विधीमंडळातील पटलावर आणली.

त्यानंतर चौकशी होऊन अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतील अनधिकृत बांग्लादेशींच्या वास्तव्याकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. तीन मजली इमारतीसाठी परवानगी असताना चौदा मजली इमारत उभारली गेली. त्यात बांग्लादेशींचे वास्तव्य होते. हा विषय समाजासमोर आणून तिथे प्रशासनाला कारवाईस भाग पाडले.

तिथेही आर्किटेक्टवर गुन्हा दाखल झाला. मुंबईत गेल्या दोन महिन्यांत नीतेश राणे यांच्या नेतृत्त्वात मानखुर्द, घाटकोपर, नागपाडा येथे तीन मोठे मोर्चे निघाले.पुण्यातील पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात नीतेश राणे हे पुढे होते. या मंदिरात राणे यांनी स्वतः जावून आरती केली. मालेगाव येथील काही मंदिरांचे नुकसान निधर्मी लोकांकडून केले गेले होते, हे नुकसान रोखून हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.  (Nashik Political news)

भुईकोट किल्ला आणि मंदिरांना हक्काच्या पोलीस चौक्या त्यांनी मिळवून दिल्या. कुठल्याही वेळी कार्यकर्त्यांचे फोन उचलणारे नेते म्हणून राणे यांची भाजपा परिवारात ओळख आहे. राज्यभर सकल हिंदू समाजाचे ६० हून अधिक मोर्चे नीतेश राणे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आले, याची पावती म्हणून राणे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले की काय? अशी भावना संघ परिवारात व्यक्त होत आहे.

हिंदुत्वासाठी योगी राज्यात

भाजपचा सर्वांत महत्त्वाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे. ही भूमिका पुढे नेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यात पाचारण करण्यात आलेले आहे. मात्र राज्यात गेल्या दोन वर्षांपासून हिंदुंना रस्त्यावर उतरण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या नीतेश राणे यांना मात्र डावलण्यात आले आहे. राज्यातील लोकसभेच्या प्रचारापासून त्यांना लांब ठेवण्यात आल्याने भाजपा आणि संघ परिवारातच आश्चर्य व्यक्त होत आहे.

''पक्ष जो आदेश देईल, तो मानण्याचे काम माझे आहे. मी शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे. अपेक्षा ठेवून मी कधीही काम करत नाही. हिंदुत्व भक्कम करण्याचे आमचे काम आहे, ते मी करत राहीन.''- नीतेश राणे, आमदार (भाजपा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT