Maha Vikas Aghadi candidate Rajabhau Waje family in campaigning esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

Lok Sabha Constituency : सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी वाजे यांना ‘भाऊ, तुम्ही फक्त नाशिक सांभाळा इथे आम्ही सर्व बघतो’ असा घरातील कुटुंबासारखा सल्ला दिलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पराग उर्फ राजाभाऊ वाजे नाशिक शहरातील चार व त्र्यंबकेश्‍वर-इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील प्रचारात व्यस्त असताना त्यांचे होमग्राऊंड असलेल्या सिन्नर तालुक्यातील प्रचाराची धुरा राजाभाऊंचे वडील प्रकाशभाऊ वाजे, पत्नी दीप्तीताई वाजे, कन्या इंजि. मानसी वाजे, सर्व नगरसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधवांच्या साहाय्याने सांभाळली आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत ते आपले प्रचार यंत्रणा सांभाळत आहेत. अनेक गावात त्यांनी आतापर्यंत प्रचार केलेला असून त्यांच्या प्रचारात महिला तसेच पुरुष कार्यकर्ते यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. राजाभाऊ वाजे यांनी सध्या नाशिकवर लक्ष केंद्रित केले असून सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी वाजे यांना ‘भाऊ, तुम्ही फक्त नाशिक सांभाळा इथे आम्ही सर्व बघतो’ असा घरातील कुटुंबासारखा सल्ला दिलेला आहे.

त्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील सर्व भिस्त आपले कुटुंब व कार्यकर्त्यांवर सोडलेली आहे. कारण अनेक दिवसांपासून स्वतः राजाभाऊ वाजे हे नाशिकलाच राहत असल्याचे दिसून येत असून त्यांच्या प्रचारासाठी सिन्नर शहरात सायकल, रिक्षा, तसेच सिन्नरमधील अनेक कुटुंब स्वतःहून दुचाकी चार चाकी यांच्यासह नाशिक येथे नातेवाईकांकडे राजाभाऊ वाजे यांचा प्रचार करताना दिसून येत आहे.

सिन्नर तालुक्यातील अनेक कुटुंबियांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे काही दिवसांपासून लक्षात येत आहे. तसेच बाजारपेठेतील बटाटा विकणारा एक व्यापारी ‘५० रुपयात बटाटे दीड किलो घ्या, पण राजाभाऊला लीड द्या’ असे भावनिक आवाहन करताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतःहून आपली दुचाकी व सायकलद्वारे ग्रामीण भागासह शहरी भागात प्रचारासाठी उन्हात फिरताना दिसून येत असल्याने हा एक चर्चेचा विषय तालुक्यात होत आहे.

तसेच अनेक सामाजिक मंडळे, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व अनेक कुटुंबियांनी आपल्या रोजगारातून, वाढदिवसानिमित्त, अनेक कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान राजाभाऊ वाजे यांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत केली आहे. राजाभाऊ रात्री बे- रात्री प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जात असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. (latest marathi news)

त्यामुळे पहिल्या प्रचार मेळाव्याप्रसंगी त्यांना तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून मदत केली. यावरून राजाभाऊ वाजे यांना मानणारा खूप मोठा वर्ग असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले होते. महाविकास आघाडीची उमेदवारी जेव्हा सिन्नर तालुक्यातील राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात पडली त्यावरून अनेक विरोधकांनी रान उठवले.

त्यामध्ये राजाभाऊ वाजे यांचे राहणीमान, त्यांची विचारशैली यावरून ते एक ग्रामीण भागातील व अतिशय कमी शिकलेले असा प्रचार केला गेला. पण राजाभाऊ वाजे यांनी आपल्या संवाद मेळाव्यातून विरोधकांना आव्हान केले की, माझे इंग्रजी स्पेलिंग आणि व्याकरण यामध्ये चूक काढा, मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेईल.

त्यावेळी त्यांनी एका पत्रकाराला संपूर्ण इंग्रजीतून फाडफाड बोलून आपले विचार मांडले. यावरूनच राजाभाऊ वाजे यांनी विरोधकांना एका प्रकारे चपराक दिल्याची चर्चा होती. साधी राहणीमान व उच्च विचारसरणी हेच त्यांची जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे मित्र त्यांना नाशिक येथे भेटण्यासाठी आले तेव्हा विविध क्षेत्रात दिग्गज मंडळी त्यांचे मित्र असल्याची बाब समोर आली होती.

सिन्नरचे मतदान ३ लाख ६ हजार ५३३ इतके असल्याने नाशिक मतदारसंघात विजयी होणाऱ्या उमेदवाराची भिस्त ‌ सिन्नर तालुक्यातील मतदानावर असते. त्यामुळे हा तालुका कोणाच्या पारड्यात किती मतांचे दान टाकतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

‘गृहमंत्री’ सकाळपासून प्रचारात

दीप्तीताई वाजे व सर्व कार्यकर्ते सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच वाड्यांवर जात. प्रचार यंत्रणा राबवली असून यासाठी सकाळी आठ वाजता दीप्तीताई वाजे यांच्यासह महिला व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक व अनेक समाज बांधव यांच्यासह मोठा ताफा हा तालुक्यात फिरत आहे.

त्यावरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गृहमंत्री मैदानात यावरून दिसून येत आहे. सकाळी न्याहारी बांधूनच हे सर्व कार्यकर्ते प्रचारार्थ बाहेर निघतात. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून दीप्तीताई वाजे यांनी तालुक्यातील प्रचाराची धुराही सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका फायनल किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज

Gold Rate Today : तुळशी विवाहादिवशी सोने झाले आणखी स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Soybean Procurement Nagpur: अखेर हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त ठरला; पोर्टल सुरू, नऊ केंद्रांना मंजुरी, सोमवारपासून नोंदणी

SCROLL FOR NEXT