bhaskar bhagare  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 Result : ‘डमी’ भगरे हरले, ‘ओरिजनल’ भगरे जिंकले!

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे (सर) यांना तब्बल एक लाखावर मते मिळाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते, असे आपल्याकडे म्हटले जाते. पण राजकारण या गोष्टीला अपवाद ठरले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे (सर) यांना तब्बल एक लाखावर मते मिळाली आहेत. नामसाधर्म्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन झाले आणि भगरे सरांना लॉटरीच लागली. (Nashik Lok Sabha Election 2024 Result)

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर महायुती विरुद्ध तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाली. भास्कर भगरे यांचे नाव पुढे येताच त्यांच्याशी मिळते-जुळते नाव असलेल्या बाबू भगरे यांचा भाजपने शोध घेतला. बाबू भगरे हे अल्पशिक्षित असून, ते नाशिक शहरात राहतात. तरीही त्यांनी दिंडोरीत अपक्ष अर्ज दाखल केला आणि तुतारी हे चिन्ह मिळवले.

ऐनवेळी त्यांनी आपल्या नावात बदल करून सर ही उपाधी लावली आणि भाजपचा हा डाव यशस्वी झाला. ईव्हीएम मशिनवर त्यांचे नाव दहाव्या क्रमांकावर असले तरी मतदारांना राष्ट्रवादीचे चिन्ह स्पष्टपणे दिसले नाही किंवा सर या एका नावामुळे मतदारांची दिशाभूल झाली. दिंडोरीत काही मतदान केंद्रांवर तर डॉ. भारती पवारांपेक्षा बाबू भगरेंना जास्त मते मिळाल्याचे दिसून आले. (latest marathi news)

प्रत्येक फेरीत बाबू भगरेंना हजारांच्या पटीत मते मिळाल्याने २६ व्या फेरीअखेर त्यांना एक लाख तीन हजार ६३२ मते मिळाली. त्यांची मते ही भास्कर भगरे यांचीच मते गृहित धरली तर डॉ. भारती पवार यांचा तब्बल दोन लाखांनी पराभव झाला, असेच म्हटले जात आहे. एका भगरेंना हरवण्यासाठी भाजपने दुसऱ्या भगरेंना मैदानात उतरवले. परंतु मतदारांचा कौल स्पष्ट असल्यामुळे ‘ओरिजनल’ भगरे जिंकले आणि ‘डमी’ भगरे हारले, असेच म्हणावे लागेल.

तलाठ्याने लावला शोध

भास्कर भगरे हे माध्यमिक शाळेचे शिक्षक असल्यामुळे ‘सर’ म्हणूनच ते प्रचलित आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने त्यांच्याशी मिळतेजुळते नाव शोधण्यासाठी तलाठ्यांची मदत घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, दिंडोरीत एकाही व्यक्तीचे नाव सापडले नाही.

पण नाशिकमध्ये बाबू भगरे या नावाची इयत्ता तिसरी शिकलेली व्यक्ती सापडली. या कामात तलाठ्याने मदत केल्यामुळे मतांचे विभाजन करण्याचा डाव भाजपने यशस्वी करून दाखवला. पण त्यांची ही खेळी डॉ. भारती पवारांना विजयापर्यंत घेऊन गेली नाही, याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT