MNS Chief Raj Thackeray esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : विचारात न घेतल्याने मनसैनिकांची घालमेल!

Political News : आम्हाला विचारात घ्या असे पत्रच मनसेकडून जाहीर करण्यात आल्याने लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेतून मनसेने एकतर्फी माघारी घेतल्याचे स्पष्ट होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटेल याबाबत निश्‍चिती नसताना दुसरीकडे महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मात्र विचारात घेतले जात नसल्याचे घालमेल सुरू झाली आहे. आम्हाला विचारात घ्या असे पत्रच मनसेकडून जाहीर करण्यात आल्याने लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेतून मनसेने एकतर्फी माघारी घेतल्याचे स्पष्ट होते. (Nashik Lok Sabha Election 2024 mahayuti MNS candidates in trouble marathi news)

मागील महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीतून महायुतीत चौथे इंजिन जोडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले. मागील आठवड्यात मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत झाला.

या वेळी मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाषणाचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करून केला. त्यामुळे महायुतीत मनसे हा चौथा पक्ष समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाले. राज ठाकरेंच्या गोष्टीला आठ दिवस उलटले तरी शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजपकडून मनसेच्या एकदाही पदाधिकाऱ्याला विचारणा झाली नाही.

नाशिकची जागा कुठल्या पक्षाला जाईल, याबाबत देखील अद्याप निश्चितता आहे. असे असले तरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीतील तिन्ही पक्षांपैकी प्रमुखांकडून संपर्क साधने अपेक्षित होतो. मात्र कुठलाही संपर्क साधला न गेल्याने मनसैनिकांची घालमेल वाढली आहे. (Nashik Political News)

मनसे कार्यालयात झालेल्या बैठकीला मनोज घोडके, निखिल सरपोतदार, अमित गांगुर्डे, रोहन जगताप, संजय देवरे, किरण क्षीरसागर, सत्यम खंडाळे, नितीन धानापुने, शशी चौधरी, बबलू ठाकूर, संदीप भंवर, संतोष कोरडे, राकेश परदेशी, प्रफुल्ल बनवेरू, सौरभ खैरनार, अर्जुन वेताळ, देवचंद केदारे उपस्थित होते.

ताकदीचा दिला अंदाज

नाशिक लोकसभा मनसेचा बालेकिल्ला आहे. २००७ मध्ये १२ नगरसेवक,न २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराला दोन लाख मतदान झाले होते. त्यानंतर तीन आमदार निवडून आले. जिल्हा परिषदेत चार सदस्य, २८२ ग्रामपंचायत सदस्य, २०१२ च्या निवडणुकीत महापालिकेत सत्ता, मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे याचे दाखले देत मनसेकडून महायुतीच्या घटक पक्षांना ताकदीचा अंदाज देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पीकविम्याचे २४०० कोटी; एप्रिलमध्ये सन्मान निधीचे प्रत्येकी ६००० रुपये मिळणार, वाचा...

बांधकाम कामगार नोंदणीत घोटाळा! ४ वर्षांत सोलापुरात वाढले सव्वालाख कामगार; एजंटांनी पैसे घेतले, ठरावीक ठेकेदारांनी दिली अनुभव प्रमाणपत्रे, वाचा...

ढिंग टांग : पुण्याची गणना कोण करी..? (एका भावी खासदाराची डायरी)

SCROLL FOR NEXT