Police on Alert Mode PM sabha esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांची जाहीर सभा; पोलीस ‘अलर्ट मोडवर’! सशस्त्र फौजफाट्यासह बंदोबस्त

Lok Sabha Election 2024 : प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी राहिला असून, या काळात प्रचार शिगेला पोहोचणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथेच होणार असल्याचे निश्चित झाल्याने पोलीसांसह सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी सशस्त्र फौजफाटा सोमवारी (ता. १३) सुरक्षेसाठी दाखल होणार आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 PM public meeting Police on alert)

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघात येत्या २० तारखेला मतदान होते आहे. प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी राहिला असून, या काळात प्रचार शिगेला पोहोचणार आहे. त्यातच महायुतीच्या उमेदवारांना जिल्ह्यात कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दोन दिवसांपूर्वी सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे स्थळ बदलावरून चर्चाही झाली होती. मात्र अखेर पिंपळगाव बसवंत येथेच सभा होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अधीक्षक विक्रम देशमाने यांनी यांच्या सूचनांनुसार, पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादी विरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यासह पोलीस विभागांचा बंदोबस्त सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. (latest marathi news)

अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत. तसेच, सभेच्या बंदोबस्तासाठी जादा कुमक पाचारण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र फौजफाटा सोमवारी (ता. १३) सभास्थळी दाखल होऊन परिसराचा ताबा घेणार आहे.

पोलिसांची सज्जता

- शहर-ग्रामीण पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त

- विशेष व गोपनीय विभागांच्या शाखा सतर्क

- एसआरपीएफ, एसएपीएफच्या तुकड्या येणार

- शहर-जिल्हा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीसा

- एटीएस, राज्य गुप्तवार्ता, विशेष सुरक्षा विभागाकडून ‘वॉच’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT