Armed Reserve Police Force of Andhra Pradesh deployed in Nashik Rural for Lok Sabha election security. esakal
नाशिक

Nashik Police : सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ‘केंद्रां’वर रवाना; शहर-जिल्ह्यात पोलिसांकडून करडी नजर

Nashik News : जिल्ह्यात ९ हजार तर शहरात ४ हजार पोलीस अधिकारी-कर्मचार्यांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक, दिंडोरी मतदारसंघात सोमवारी (ता. २०) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात ९ हजार तर शहरात ४ हजार पोलीस अधिकारी-कर्मचार्यांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, रविवारी (ता. १९) सकाळी सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान साहित्यासह अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे. ( Deployment of armed police to polling centres)

याठिकाणी १०० मीटर पर्यंतचा परिसर सोमवार सकाळपर्यंत आणखी करून ‘सील’ केला आहे. तसेच, शहर-जिल्ह्यात पोलीसांकडून कडेकोट बंदोबस्तासह कोणतेही गैरकृत्य घडणार नाही यासाठी करडी नजर ठेवली जात आहे. शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, शहरातील नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली कॅम्प विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर बंदोबस्ताचे ‘मायक्रो’ नियोजन केले असून.

त्यानुसार शहरात साडेचार हजार सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी (ता. १९) सकाळपासून सशस्त्र बंदोबस्तात ‘इव्हीएम’ आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर पोहोच करीत केंद्रांचा ताबा घेण्यात आला आहे. यानंतर, मतदान केंद्राभोवती शंभर मीटरची आखणी करुन घेत पोलिसांनी मतदान केंद्रांचा परिसर सोमवार (ता. २०) सकाळपर्यंत सील केला आहे. या ठिकाणी पोलिसांचा रात्रभर मुक्काम राहणार आहे.

करडी नजर

दरम्यान, प्रत्यक्ष प्रचार बंद झाला असून, छुप्यारितीने उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून गैरमार्गाने मतदारांना प्रलोभने दाखविले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीसांच्या विशेष पथकांसह पोलीस ठाणेनिहाय हद्दीत पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातही बारकाईने नजर ठेवली जात आहे. शहरात चौक-चौकात पोलिसांकडून गस्ती घालती जात आहे. (latest marathi news)

शहरातील फौजफाटा

- १ आयुक्त, ४ उपायुक्त, ७ सहायक आयुक्त

- अडीचशेपेक्षा जास्त पोलिस अधिकारी

- अडीच हजार पोलिस अंमलदार

- मध्य प्रदेशातील १ हजार होमगार्ड

- आंध्र प्रदेशातील १ हजार राखीव पोलिस

- लातूर, नागपूर, गोंदीया, गडचिरोलीतून ४०० अंमलदार

- सीआरपीएफच्या ५ तुकड्या

- केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) २ तुकड्या

ग्रामीणमधील फौजफाटा

- १ अधीक्षक, २ अपर अधीक्षक

- १३ उपअधीक्षक, ३५५ अधिकारी

- ५ हजार ८०० पोलिस अंमलदार

- ३ हजार ३०० होमगार्ड

- आंध्र प्रदेश सशस्त्र राखीव पोलिस १० तुकड्या

- राज्य राखीव पोलिस (एसआरपीएफ) २ तुकड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT