Former MLA Rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे?

Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागेवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागेवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. श्री. वाजे यांच्या निवडीसंदर्भात दोन दिवसांत घोषणा होईल, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापलेल्या राजकीय वातावरणात अंतर्गत हेवेदावेही पुढे येत आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024)

महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाला नाशिकची जागा हवी आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. मात्र शिंदे यांना महायुतीच्या जागेसंदर्भात घोषणा करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करत भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर भाजपमध्येही नाशिकच्या जागेवरून अन्नत्यागाचा इशारा देण्यात आला.

रविवारी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नाशिकमधील आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेत नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शिवसेनेला जागा निश्चित करून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नावदेखील निश्चित केल्याचे बोलले जात आहे.

शिवसैनिक म्हणून वाजेंचे नाव

दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी नाशिकचा आढावा घेतला. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्यांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले. त्या वेळी नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडावी, असा आग्रह धरण्यात आला. (latest marathi news)

त्या अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याच्या दृष्टीने माजी आमदार वाजे यांचे नाव निश्चित करण्यात आले असे बोलले जात आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दीड लाख मते, इगतपुरी या ग्रामीण भागातील संपर्काचा विचार करून त्यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

...तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी?

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत भाजप, शिंदे सेना, मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या चारही पक्षांकडून मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याचे समजते. नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडून भाजपकडून नाशिक राष्ट्रवादीतील हुकमी एक्का मैदानात उतरविण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT