B.D. in Bhadrakali area. Deputy Commissioner of Police Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Dr. Siddheshwar Dhumal. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : संवेदनशील मतदान केंद्राची पोलिसांकडून पाहणी; बंदोबस्तावरील अंमलदारांना दक्षतेच्या सूचना

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक शहरातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस अधिकाऱ्यांनी आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक शहरातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस अधिकाऱ्यांनी आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली. विशेषतः: संवेदनशील मतदान केंद्रांवरील नियुक्त पोलिस अंमलदारांना दक्षतेच्या सूचना करण्यात आल्या. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सोमवारी (ता. २०) पार पडत आहे. नाशिक आयुक्तालय हद्दीत पोलिसांकडून कडेकोट सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. ( Inspection of sensitive polling station by police in city )

परिमंडळ एकमध्ये पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या बी. डी. भालेकर शाळेच्या आवारातील मतदान केंद्राला रविवारी (ता. १९) सायंकाळी भेट देत पाहणी केली. यावेळी याठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिस अंमलदारांना महत्त्वाच्या सूचना देतानाच, दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या.

तसेच, कोणताही अनुचित प्रकार मतदान बुथवर घडणार नाही याकडे लक्ष देण्यास सांगत, सेक्टर अधिकारी व स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती कळविण्याची सूचना केली. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील मतदान केंद्राच्या इमारतीची पाहणीही केली. (latest marathi news)

याचप्रमाणे, परिमंडळ दोनमध्ये पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अंबड, सातपूर हद्दीतील संवेदनशील केंद्रांना भेटी देत पाहणी केली आहे. सिडकोत शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिडकोत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

''बी.डी. भालेकर शाळेत एकूण ९ बुथ आहेत. तसेच संवेदनशील केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला आहे. तसेच अधिकारी, अंमलदारांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT