Keshav Upadhyay esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : सर्वच घटक पक्षांना हवीय नाशिकची जागा : केशव उपाध्ये

Lok Sabha Election : महायुतीमधील सर्वच घटक पक्षांना नाशिकची जागा हवी आहे, त्यात गैर नाही. भारतीय जनता पक्षालाही नाशिकची जागा पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : महायुतीमधील सर्वच घटक पक्षांना नाशिकची जागा हवी आहे, त्यात गैर नाही. भारतीय जनता पक्षालाही नाशिकची जागा पाहिजे. मात्र, महायुती म्हणून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतील, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. शेवटच्या टप्प्यात नाशिकची निवडणूक असल्याने जागानिश्चितीसंदर्भात विलंब होत असल्याची सारवासारव त्यांनी केली. ()

भाजपच्या संकल्पपत्राबाबत पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपाध्ये बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात जागावाटपावरून महाविकास आघाडीतही गोंधळ आहे. नाशिकसह मुंबईच्या जागांवर मतदान शेवटच्या टप्प्यात असल्याने उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा केला जात आहे. मात्र, हा दावा गैर नाही.

जोपर्यंत जागानिश्चिती होत नाही, तोपर्यंत प्रत्येक पक्षाचा दावा राहील. प्रत्येक पक्षाने नाशिकचा आग्रह धरणे वाईट नाही. महायुतीच्या जागेसंदर्भात एकत्रित निर्णय होईल. नाशिकचा उमेदवार कोण असावा, हा प्रश्न नाही. कारण, नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहेत.  (latest marathi news)

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना दोघेही पळपुटे असल्याची टीका त्यांनी केली. अशा पळपुट्यांमागे भगवान श्रीराम उभे राहत नाहीत, असे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे काम केले. काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण झालेल्या प्रत्येक समस्या त्यांनी सोडून देशाला समृद्ध केले.

सन २०१७ पर्यंत भारत जगातील सर्वांत समृद्ध देश म्हणून ताठ मानेने जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मोदी यांनी दिल्याचे ते म्हणाले. या वेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, प्रदीप पेशकार, प्रवीण अलई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT