Officials requesting withdrawal of boycott of Lok Sabha polls. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मतदानावरील बहिष्करास्त्र मागे घ्यावे लासलगावकरांना अधिकाऱ्यांची विनवणी

Lok Sabha Election : लासलगाव येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : येथील १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे लासलगाव येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी निवडणुकीच्या कामांमुळे गैरहजर असल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकारी वर्गासोबत बैठक घेण्यात आली. ( Officials request people of Lasalgaon to withdraw boycott on voting )

या दरम्यान तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंत्यांनी उपस्थितांना लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकू नये, यासाठी विनंती केली. लासलगाव येथे २० ते २२ दिवसांपासून पाणी आलेले नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे संतप्त नागरीकांनी शनिवारी (ता. ११) लासलगांव बंद ठेवत मतदानावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे गावकऱ्यांकडून गाव बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. ८ मे च्या बैठकीमधील नागरीकांच्या रोषानंतर नांदुरमध्यमेश्‍वर धरणामध्ये वालदेवी, मुकणे व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणात पाणी आल्यामुळे लासलगावसह योजनेत समाविष्ठ गावांना पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. (latest marathi news)

याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. १३) लासलगावचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भास्कर शिंदे, गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांचे प्रतिनिधी म्हणून लासलगाव शहर विकास समिती पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकारी व नागरीकांमध्ये साधकबाधक चर्चा झाली.

सर्वांच्या समस्या ऐकून घेत त्यावरील उपाययोजनांबाबत अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब हांडळ, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, पोलिस कर्मचारी सुजय बारगळ, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, शहर विकास समितीचे संदिप उगले, राजू कराड, विकास कोल्हे, चंद्रकांत नेटारे, महेंद्र हांडगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT