Dinkar Patil, Dr. Rahul Aher, Narhari zirwal, manikrao Kokate and Sameer Bhujbal
Dinkar Patil, Dr. Rahul Aher, Narhari zirwal, manikrao Kokate and Sameer Bhujbal  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Elections : लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी; भाजपकडून अनेक मोठी नावे चर्चेत

विक्रांत मते

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे इच्छुकांची कोंडी झाली असताना दुसरीकडे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये भाजपकडून महापालिकेच्या राजकारणाची जाण असलेला चेहरा म्हणून आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नावाची चाचपणी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना दिंडोरीत नरहरी झिरवाळ, तसेच नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्यासह ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. (Nashik Lok Sabha Election Scrutiny of candidates for Lok Sabha Many big names from BJP in discussion Nashik News)

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जवळपास सव्वा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी २०२४ च्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता लोकसभेचे अडीच मतदारसंघ आहेत. यात नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघाला जोडलेला मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या भागाचा समावेश होतो.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून तगडा उमेदवार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील लोकसभेचा हक्काचा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात डॉ. पवार यांना तोडीस तोड देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे प्रतिनिधित्व करत आहे. शिंदे गट व भाजपच्या वाटाघाटीमध्ये शिंदे गटातून नाशिक लोकसभेच्या जागेची मागणी केली जाईल. त्या वेळी खासदार गोडसे यांचे नाव पुन्हा स्पर्धेत येईल; परंतु भाजपकडून नाशिकचा मतदारसंघ सहजासहजी सोडला जाणार नाही. त्यामुळे आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरी, ग्रामीण असा चेहरा लागणार आहे. अधिकाधिक शहरी मतदारांवर पकड, नातेवाईक, मतदारांपर्यंत पोचण्याची क्षमता याबाबी तपासल्या जाणार आहेत. त्याअनुशंगाने भाजपकडून स्पष्ट चेहरा समोर आला नसला तरी चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. पाटील यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलक नाशिक लोकसभा मतदारसंघात लावल्याने चर्चेचा विषय ठरले. त्या व्यतिरिक्त पाटील यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे जवळपास दोन लाख पत्रके वाटली, तसेच अखिल भारतीय महानुभाव पंथाचे संमेलन भरविताना राज्यपातळीवरचे भाजपचे नेते व्यासपीठावर बोलाविल्याने ते लोकसभेची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते.

राष्ट्रवादीकडून चाचपणी

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघात नव्या ताकदीने उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्या अनुषंगाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्याबरोबरच सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चाचपणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT