nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा; व्यावसायिक, विक्रेत्यांचा पुढाकार

Lok Sabha Election : सोमवारी (ता. २०) नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : मतदान केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी आहे. सोमवारी (ता. २०) नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. अनेक नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी शहरातील विविध व्यावसायिकांनी मत देणाऱ्या नाशिककरांसाठी भरघोस सूट देऊ केली आहे. ( Vote and get discounts on purchases Businessmen sellers initiative )

मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई दाखवा अन् ५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळवा अशी योजना शहरातील अनेक व्यावसायिक, विक्रेत्यांनी आपल्या दुकानात सुरु केली आहे. लोकशाहीत देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असून मतदान हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. विविध क्षेत्रातील नोकरदारांनी मतदानासाठी पगारी सुटीदेखील मिळते.

मात्र तरीही अनेक नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. लोकसभा निवडणुकीतील चौथा टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. मात्र यापूर्वी झालेल्या तीन टप्प्यांत बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारसंघातील लोकसंख्येच्या पटीने ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान न झाल्याचे समोर आले आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. (latest marathi news)

लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक असते, त्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे या भावनेतून शहरातील विविध व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांनी मतदान करून बोटाला लावलेली शाई दाखवा अन् खरेदीवर भरघोस सूट मिळवा अशी योजना सुरु केली आहे.

यांचा पुढाकार

शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, वाहन विक्रेते यासह कटिंग सलून यासह विविध व्यावसायिकांनी सोमवारी मतदात्यांसाठी खरेदीवर ५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी अनेक नागरिकांना सुटी असते. त्यामुळे मतदान करून कुटुंबासह हॉटेलमध्ये भोजनासाठी देखील गर्दी होते, विविध हॉटेल्समध्येदेखील सूट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT