Police Security esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Vote Counting : पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त! आयुक्तांकडून पाहणी; उपायुक्त तळ ठोकून

Nashik Police : मतमोजणी संपेपर्यंत पोलीस उपायुक्तांसह सहायक आयुक्त मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Vote Counting : अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊस येथे नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी असल्याने याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होण्यापूर्वीच येथील बंदोबस्ताचा आढावा घेत पाहणी केली. तर मतमोजणी संपेपर्यंत पोलीस उपायुक्तांसह सहायक आयुक्त मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. (Nashik Lok Sabha Vote Counting Strict Police Security)

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होती. त्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले होते. तसेच, वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलेले होते.

त्यानुसार मंगळवारी पहाटे चार वाजेपासून बंदोबस्त तैनात होता. तसेच, जागोजागी बॅरिकेटिंग करण्यात येऊन रस्ते बंद केले होते. तर, वाहतूक पोलिसांकडून पॉईंट करून वाहतूकीला पर्यायी मार्गाने वळविले होते. त्यामुळे वेअर हाऊसचा परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आलेले होते.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होण्यापूर्वी वेअर हाऊस परिसरातील बंदोबस्ताची पाहणी करीत सूचना केल्या. यावेळी परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, संदीप मिटके, नितीन जाधव, डॉ. सचिन बारी यांच्यासह चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना परिसरात गर्दी होणार नाही याबाबत सूचना केली. (latest marathi news)

उपायुक्त तळ ठोकून

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी केल्यानंतर शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी वेअर हाऊस बाहेरच आपला तळ ठोकला होता. मतमोजणी सुरू असताना विना ओळखपत्र असलेल्यांना पोलिसांकडून प्रवेश नाकारला जात होता.

कसून तपासणी; मोबाईलला नो-एन्ट्री

वेअर हाऊसमध्ये प्रवेश करण्यासाठी निवडणूक विभागाकडून ओळखपत्र देण्यात आलेले होते. चार प्रवेश मार्गांवर पुरुष व महिला पोलीसांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांच्याकडून कसून तपासणी केल्यानंतरच संबंधितांना प्रवेश दिला जात होता. यावेळी मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे अनेकांकडे ओळखपत्र असूनही मोबाईलमुळे त्यांना आत जाता येत नव्हते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT