Women Leadership
Women Leadership esakal
नाशिक

Women Leadership : समाजमन- पुरुषप्रधान संस्कृतीत महिला नेतृत्वाला महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

नेतृत्व करण्यास महिलांना कमी सक्षम मानणाऱ्या समाजातील पुरुषसत्ताक नियमांना व वृत्तींना आव्हान देणे आणि ते बदलणे आवश्यक आहे. त्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्या क्षमतांचे कौतुक करण्याच्या दिशेने सांस्कृतिक बदलाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ज्याद्वारे समाजात बदल घडू शकतो. महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत अर्थपूर्णपणे समाविष्ट करणे आव्हानात्मक आहे. त्याकरिता व्यक्ती, समाज, सरकार आणि जागतिक संस्था यांच्याकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. (nashik marathi article on Importance of women leadership in male dominated culture)

आपल्या समाजात स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आपण सहजपणे बोलून जातो, की पुरुषप्रधान संस्कृतीत आपण जगतो. मात्र, स्त्रियांचे महत्त्व आजच्या युगात अधोरेखित आहे. आताच काय पौराणिक, ऐतिहासिक कालावधीत स्त्रियांची महती व्यक्त होते.

२०११ च्या जनगणनेनुसार महिलांची संख्या ५८६.४७ दशलक्ष आहे आणि त्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ४८.४६ टक्के आहेत. अनेक अभ्यासांतून आलेल्या सूचनांचा विचार केल्यावर संपूर्ण समाजाचा विशेषत: महिलांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येते.

आदर्शनिर्मितीत योगदान

जसे आपले घर सुंदर अथवा आदर्श निर्माण करण्यात सर्वांत मोठा सहभाग घरातील महिलेचा असतो, तसेच आपले शहर व आपला परिसरही आदर्श सिद्ध होण्यात स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे, हे आपण कदापि विसरून चालणार नाही. म्हणूनच महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूरही झालेले आहे. आदर्श समाजनिर्मितीत स्त्रियांना सर्व क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी दिली पाहिजे.

महिलांना अधिक संधी आवश्यक

महिला आपल्या दैनंदिन आयुष्यात आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिका निभावत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पडत असतात. यात प्रामुख्याने स्वच्छता परिसर, आपल्या पाल्यांची शिस्त, शिक्षण, आर्थिक नियोजन, आहार, नातेसंबंधाची जपणूक, काटकसरपणा व आर्थिक नियोजन अशा प्रकारे आपले घर सुंदर बनविण्यासाठी शक्य होईल ते सर्व करीत असते.

आपण निरीक्षण केले तर या सर्व बाबी आपल्या समाजाशी संबंधित आहेत. महिला घर सुंदर करण्यासाठी जे प्रयत्न करते, तेच प्रयत्न आपण शहर सुंदर करण्यासाठी केले तर निश्चितच आदर्श शहर निर्माण होऊ शकते, म्हणूनच महिलांना अधिक संधी देणे आवश्यक आहे. शासन त्या-त्या परीने प्रयत्न करतेच; पण ज्यांना शक्य आहे, त्यांनी ते केले पाहिजे. संशोधन, शिक्षणप्रणालीत महिलांचा सहभाग आवश्यक आहे. (latest marathi news)

मर्यादित संधींमुळे असमानता

निर्णय घेण्याच्या आणि धोरण विकासाच्या सर्व स्तरांवर महिलांच्या संपूर्ण आणि समान सहभागाशिवाय शाश्वत विकासाचा पाठपुरावा प्रभावीपणे केला जाऊ शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलांना संधी देणे म्हणजेच शाश्वत विकासाची गुरुकिल्ली होय. शाश्वत विकास, प्रयत्नांची परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

यासाठी निर्णय व धोरण विकासात महिलांचा संपूर्ण आणि समान सहभाग असणे आवश्यक आहे. शाश्वत विकास, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या भूमिकांमध्ये महिलांना अधिकाधिक सहभागी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. महिलांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या, विरंगुळ्याच्या आणि राजकीय सहभागाच्या मर्यादित संधी उपलब्ध असल्याने यामुळे लिंग-आधारित सामाजिक आणि आर्थिक असमानतेला बळकटी मिळते.

नेतृत्वासाठी प्रवृत्त करणे बहुआयामी कार्य

महिलांना निर्णय घेण्याच्या आणि धोरण विकासाच्या सर्व स्तरांवर समान सहभागाशिवाय शाश्वत विकासाचा प्रयत्न प्रभावीपणे करता येणार नाही. नेतृत्वातील महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान महिला सक्षमीकरणाच्या परिवर्तनीय क्षमतेची आठवण करून देते. विकास प्रभावीपणे प्रस्थापित करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता अंतर्भूत करण्यासाठी महिलांच्या केवळ ‘समावेशा’पासून पुढे जात, त्यांचा विकास घडवीत निर्णय घेण्याच्या भूमिकेत महिलांना आणणे महत्त्वाचे आहे.

केवळ महिलांच्या क्षमता वृद्धिंगत व्हायला हव्यात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करायला हवे, इतकेच पुरेसे नाही तर त्यांना निर्णय घेण्याच्या आणि धोरण विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी समान संधीही प्राप्त व्हायला हव्यात. महिलांना नेतृत्व करण्याकरिता प्रवृत्त करणे हे बहुआयामी कार्य आहे, ज्यासाठी समान ध्येय साध्य करण्यासाठी सरकारी संस्था, खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांसारख्या अनेक भागधारकांचा सहयोग आवश्यक असतो, त्यांनी आवश्यक बदल करणे आवश्यक आहे.  (latest marathi news)

निर्णयप्रक्रियेसाठी ज्ञानकौशल्य हवे

महिलांनी निर्णयप्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी व्हावे, यासाठी महिलांना ज्ञानकौशल्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे किंवा जे उपलब्ध करून देत असतील, जे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतील, त्यांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे. शिक्षण ही महिलांसाठी पुढील ज्ञानाची अथवा कर्तृत्वाची बाह्य मर्यादा आहे.

शिक्षण व्यवस्थांनी मुलींना सक्रिय सहभागी, नेतृत्व करणाऱ्या आणि निर्णयक्षम होण्याकरिता प्रोत्साहित करायला हवे. यामुळे महिलांच्या निर्णय घेण्याच्या भूमिकेतील सहभागाला महत्त्व देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यात मदत होऊ शकते.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांतील उच्चशिक्षणात महिलांच्या सहभागातील आणि नंतर संबंधित क्षेत्रातील त्यांच्या नोकरीतील अडथळे ओळखून, ते दूर करणे आवश्यक आहे. महिलांच्या निर्णय घेण्याच्या भूमिकेतील सहभागाला महत्त्व देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यात मदत होऊ शकते.

नेतृत्व करण्यास महिलांना कमी सक्षम मानणाऱ्या समाजातील पुरुषसत्ताक नियमांना व वृत्तींना आव्हान देणे आणि ते बदलणे आवश्यक आहे. महिलांच्या क्षमता ओळखणे आणि त्या क्षमतांचे कौतुक करण्याच्या दिशेने सांस्कृतिक बदलाला प्रोत्साहन देणे हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये महिलांचा समावेश होण्याकरिता आवश्यक आहे, ज्याद्वारे समाजात बदल घडू शकतो. महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत अर्थपूर्णपणे समाविष्ट करणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी व्यक्ती, समाज, सरकार आणि जागतिक संस्था यांच्याकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT