Dr. Bharti Pawar esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवारांची संपत्ती दुप्पट; पतीच्या संपत्तीतही दुपटीने वाढ

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावे एकूण ८३ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता त्यांची संपत्ती दोन कोटी १३ लाखांवर पोहोचली आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

विशेष म्हणजे, त्यांचे पती प्रवीण पवार यांच्याही संपत्तीत दुपटीने वाढ झाल्याचे डॉ. पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी गुरुवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) अधिकृत एबी फॉर्म जोडला.

तर महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी महायुतीतर्फे अर्ज सादर केला. अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती निवडणूक आयोगाला कळवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक संपत्ती १३ कोटी रुपयांची होती. डॉ. पवार यांच्या नावे २०१९ मध्ये ५३ लाख ४२ हजारांची जंगम मालमत्ता होती.

ती आता ६३ लाखांवर पोहोचली आहे; तर ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता २०२४ मध्ये दीड कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. यात मखमलाबाद येथील प्लॉटचे बाजारमूल्य वाढल्याचे दिसून येते. डॉ. भारती पवारांकडे साडेपाच लाखांचे ८० ग्रॅम सोने आहे. जवळपास दीड किलो चांदी (एक लाख आठ हजार), १६ लाखांच्या विविध बँकांमध्ये ठेवी, दहा लाखांची एलआयसी विमा पॉलिसी त्यांच्या नावे आहे. (Latest Marathi News)

बँक ऑफ बडोदाचे नऊ लाखांचे शेअर त्यांनी घेतल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यांच्या नावे एक रुपयाचेही कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचे पती प्रवीण पवार यांच्या नावे एक कोटी सहा लाखांची जंगम मालमत्ता, तर १९ कोटी ३४ लाख ८१ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. यात विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जागा, प्लॉट्स व वडिलोपर्जित संपत्तीचा समावेश आहे. प्रवीण पवार यांच्या नावे पावणेतीन लाखांचे कर्जही असल्याचे दिसून येते.

दिंडोरी मतदारसंघात पल्लवी भास्कर भगरे यांनीही अर्ज सादर केला. त्यांच्या नावे १६ लाखांची चल संपत्ती आहे; तर अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्या नावे ७२ हजारांची चल व चार लाखांची अचल संपत्ती असल्याचे दिसून येते.

चव्हाणांवर साडेसहा लाखांचे कर्ज

माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनीही आपला अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे ६२ लाख ८५ हजारांची चल संपत्ती असून, यात ३८ ग्रॅम सोने, एक इनोव्हा कारचा समावेश आहे. एक कोटी ४६ लाखांची अचल संपत्ती त्यांच्या नावे असली, तरी सहा लाख ४० हजार रुपयांचे कर्जही दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT