Groom Mahesh and bride Kajal arrived at the wedding hall in a bullock cart.
Groom Mahesh and bride Kajal arrived at the wedding hall in a bullock cart. esakal
नाशिक

Nashik News : महेश आणि काजलची बैलगाड्यातून मंडपात एंट्री; विवाहात बैलगाडाप्रेमी वधू-वराचा ‘नादच खुळा’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुसूर (ता. येवला) येथे रविवारी (ता. ३) झाडलेल्या विवाह सोहळ्यात वर आणि वधू चक्क बैलगाड्यावर बसून लग्नमंडपात हजर झाले. बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये हा विषय चर्चेचा ठरला. विसापूर (ता. येवला) येथील (कै.) लहानू सोनवणे यांचे पुत्र महेश व कुसूर येथील बाबासाहेब गायकवाड यांची कन्या काजल यांनी बडेजावाला फाटा देत बैलगाड्यावर स्वार होऊन मंडपात आगमन केले. (nashik Mahesh and Kajal entered into pavilion in bullock cart marathi news )

हा सर्व प्रसंग पाहून सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले. घोड्याचे मालक चांगदेव गायकवाड यांचा ‘शामा’ घोडा जिल्ह्यात आपल्या देखण्या रूपाने व धूमगतीने पट गाजविणारा ‘बाजीराव’ गोऱ्हा आकर्षण ठरला. आजकाल बोहल्यावर चढणारे नवरदेव नवरी घोडा बग्गी, बलून, डोलीमधून अन् ‘बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है’ या गाण्याच्या सुरात मंडपात आगमन करतात. मात्र, कुसूर येथे रविवारी झालेला विवाह या सर्वांना छेद देणारा ठरला. (latest marathi news)

वर महेश आणि वधू काजल यांना बैलगाडा शर्यतीची आवड असल्याने आणि महेश हा बैलगाडा शर्यतीत नेहमी सहभाग घेतो. त्या दोघांनी बैलगाड्यातून लग्नमंडपात आगमन केले. वराचे मित्र व वधूकडील किरण पवार, केशव गावडे, समाधान महाले, पप्पू महाले, गोकुळ गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, शंकर निकम, पप्पू पवार, संकेत पवार, अक्षय गाडे, औंकार कोल्हे, नाना भुजाडे यांनी ही अनोखी मिरवणूक काढली.

''मराठमोळा मर्दानी खेळ, म्हणून बैलगाडा शर्यतीकडे बघितले जाते. ‘पाटलांचा नादच खुळा’ असे मराठी गीतही आहे. नाद एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत, असे आवड असलेल्या वर महेश यांचे बैलगाडा प्रेमपाहून भारावून गेलो.''-केशव गायकवाड, कुसूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT