Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : मुख्य संशयित वैभव लहामगेला ठाण्यातून अटक! कुस्तीपटू लहामगे खुन प्रकरण

Nashik News : कुस्तीपटू भुषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांच्या खुनातील मुख्य संशयित वैभव यशवंत लहामगे यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाणे ग्रामीण हद्दीतून पकडले.

सकाळ वृतसेवा

Nashik News : मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे कुस्तीपटू भुषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांच्या खुनातील मुख्य संशयित वैभव यशवंत लहामगे यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाणे ग्रामीण हद्दीतून पकडले. भूषण यांची शुक्रवारी धारदार हत्याराने वार करीत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिसांनी वैभवच्या वडिलांना अटक केली आहे. (Nashik main suspect in murder of wrestler Bhushan Lahamge Vaibhav Yashwant Lahamge was arrested)

भुषण लहामगे यांची शुक्रवारी दुपारी महामार्गावर हत्या झाली. कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी भुषणच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर भुषण यांनी दुचाकी सोडून पळ काढला असता मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयता, चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर मारेकरी पसार झाले.

याप्रकरणी अदिती भुषण लहामगे यांनी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात भुषणचा चुलत भाऊ वैभव यशवंत लहामगे, त्याचे वडिल यशवंत लहामगे व आई सुमनबाई यशवंत लहामगे यांच्यासह इतर मारेकऱ्यांविरोधात खुनाची फिर्याद दिली.

पोलिसांनी यशवंत यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता.१६) पोलिस कोठडी सुनावली आहे. तर वैभवच्या मागावर असलेल्या ग्रामीण पोलिसांनी त्यास ठाणे ग्रामीणमधून ताब्यात घेतले. (latest marathi news)

आयसीआयसीआय बँकेच्या चोरीत वैभवाचा हात

नाशिकमधील जुन्या गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमधील सुमारे पाच कोटींच्या दागिने चोरीच्या गुन्ह्यातही वैभव लहानगे याचा हात असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

शहर पोलिसांनी अटक केलेल्या तुकाराम गोवर्धने याने बँकेतील महत्त्वाची माहिती वैभवला दिली होती वैभवनेच आणखी दोघांकडून बँकेच्या लॉकर मधील सोने चोरीचा कॉटर असून तो अमलात आणल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT