Happy Farmer
Happy Farmer esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव, सिन्नर, येवल्यात अनुदानापोटी 248 कोटी मिळणार! खरीप हंगामातील नुकसानीची मदत

सकाळ वृत्तसेवा

वावी : गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला. राज्य शासनाकडून कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक फळ पिकांखाली असलेल्या क्षेत्रासाठी सिन्नर, मालेगाव व येवला तालुक्यांना अनुदान मिळणार आहे. या तीन तालुक्यांतील दोन लाख ५१ हजार ६७५ शेतकऱ्यांना २४८ कोटींचे अनुदान वाटप होईल.

गेल्या खरीप हंगामात तीन तालुक्यांत दोन लाख ७१ हजार ७४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. महसूल विभागाने सिन्नर, मालेगाव व येवला तालुक्यांसाठी २४८ कोटींची मागणी केली होती. नुकसान बाधित क्षेत्र निश्चित करण्यासाठी ई पीक नोंदणी अहवालाचा आधार घेण्यात आला.

(Nashik Malegaon Sinnar Yeola will get 248 crore subsidy marathi news)

मालेगाव तालुक्यात सर्वाधिक एक लाख १,९१२ शेतकऱ्यांना १०८ काेटी ९२ लाख, सिन्नर तालुक्यातील ८५ हजार ८६५ शेतकऱ्यांना ७५ कोटी ८१ लाख आणि येवला तालुक्यातील ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना ६३ कोटी ३३ लाख रुपये दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाने दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत होणार आहे.

तीन हेक्टरच्या आत मिळणार मदत

शासनाच्या नवीन निकषानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी आठ हजार ५०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी १७ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळ पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी मदत निश्चित झाली आहे. ३३ टक्के किंवा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळेल. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत मिळेल.

मालेगाव, येवल्यात मोठे नुकसान

मालेगाव आणि येवला तालुक्यात खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. तेथे बागायती पिकांच्या नुकसानीची नोंद नाही. सिन्नर तालुक्यात आठ हजार ८६४ शेतकऱ्यांचे ५,२०७ हेक्टर बागायती दुष्काळाने बाधित झाली. त्यासाठी आठ कोटी ८५ लाख वितरित होतील.

येवला तालुक्यात बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान नाही. सिन्नरला ८३ शेतकऱ्यांचे ६५.३२ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना १४ कोटी ७० लाखांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. मालेगाव तालुक्यात आठ हजार ५९९ शेतकऱ्यांचे ८,९७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यापोटी २० कोटी १९ लाखांची भरपाई मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT