Mango Season Start (file photo) esakal
नाशिक

Nashik Mango Season : आंबे बाजारात दाखल; अक्षय्यतृतीया होणार गोड! प्रतिकिलो 100 ते 140 रुपयांचा दर

Nashik News : क्षय्यतृतीया उशिरा आल्याने बाजारात आंब्याचे आगमन यापूर्वीच झाले आहे. थोड्याफार प्रमाणात स्थानिक तसेच कोकण वा परराज्यातील आंब्यावर यंदाची अक्षयतृतीया गोड होणार आहे.

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

देवळा : यावर्षी अक्षय्यतृतीया उशिरा आल्याने बाजारात आंब्याचे आगमन यापूर्वीच झाले आहे. थोड्याफार प्रमाणात स्थानिक तसेच कोकण वा परराज्यातील आंब्यावर यंदाची अक्षयतृतीया गोड होणार आहे. या सणाला फळांच्या राजाचे पुरेसे आगमन होणार असल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील असे चित्र आहे. (Mangoes enter market 100 to 140 rupees per kg)

आंब्यांच्या रसाचा नैवेद्य (आगारी) पूर्वजांना दाखवून हा सण साजरा केला जातो म्हणून या सणाला आमरस करून सण गोड करण्याकडे कल राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षयतृतीया हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरणपोळीचे सुग्रास जेवण हा त्यातील एक महत्वाचा भाग असतो.

आमरसाच्या पंगतींना खऱ्या अर्थाने या सणापासूनच सुरुवात होते. पण, दरवर्षी बाजारात पुरेसा आंबा येतोच असे नाही. परंतु, यावर्षी बदाम, लालबाग, केशर, हापूस, पायरी या व इतर प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. कोकण, कर्नाटक व इतर राज्यातून येणाऱ्या या आंब्यांना मोठी मागणी असते.

देवळा व कळवण तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात गावठी व आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. काही शेतकऱ्यांनी फळशेतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातीची आंब्यांची झाडे लावून आमराया वाढवल्या आहेत. या कैऱ्या परिपक्व होऊ लागल्याने तोही आंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे. यावर्षी कळवणसह या भागातील काही आंब्यांना चांगला मोहोर आला. तर काहींना मोहोरच आला नाही. (latest marathi news)

तापमानात एकदम वाढ झाल्याने लहान आकाराची फळे गळून पडली. तर काही भागात बेमोसमी पावसाने दगा दिला. यामुळे आंब्याच्या उत्पादनाला काहीअंशी झटका बसला आहे. अक्षयतृतीयेनिमित्त आंबा बाजारात येवू लागला असून, त्याचे भाव किमान १०० ते कमाल १२०-१४० रुपये किलो आहेत. अक्षय्यतृतीयेपर्यंत हे भाव आणखी कमी होतील, असा अंदाज आहे.

"बाजारात दाखल होणारा आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकला आहे की रसायनांच्या मदतीने याकडे ग्राहकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रसायनांच्या मदतीने पिकवलेला आंबा हा चहुबाजूने पिवळा दिसतो. यामुळे त्याची मूळ चव बदलून तो आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक व हानिकारक ठरू शकतो. म्हणून आंबा खरेदी करताना देठाजवळ पिवळा असलेला व देठाच्या विरुद्ध बाजूस हिरवा असलेला आंबा खरेदी करावा." - डॉ. राजेंद्र गुंजाळ, देवळा

अक्षयतृतीया, गौराई व झोका

ग्रामीण भागात चैत्र पौर्णिमेपासून अक्षयतृतीयेपर्यंत गौराईची स्थापना प्रत्येक घरी केली जात असे. लाकडी शंकर-पार्वती असे गौराईचे रूप असे. त्यावर गुंज, पानाफुलांची पत्री लावून घरातच आकर्षक सजावट मुली व महिलावर्ग करत असे. या दिवसांत घरात, झाडांच्या फांदीना व इतर सोयीच्या ठिकाणी बांधलेल्या झोक्यावर ‘गौर मनीं सई वं- आता कधी येशी वं’ अशी गौराईची गाणी मोठ्या आवडीने गायली जात. काळाच्या ओघात व मोबाईलच्या जमान्यात आता गौराई, गौराईची गाणी व झोका मागे पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st Test: भारताची प्लेइंग इलेव्हन ठरवताना 'या' गोष्टीमुळे कन्फुजन, कर्णधार शुभमन गिलने स्पष्टच सांगितलं

"संजय दत्त हा देशद्रोहीच" प्रसिद्ध शेफने अभिनेत्यावर केले आरोप ; "आईचा मृतदेह म्हणून शरीराचा कोळसा.."

Latest Marathi Breaking News Live : पुण्यात पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीतील गैरव्यवहार उघडकीस; महसूल मंत्री बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांवर निलंबनाचे आदेश

Nashik Leopard Attack : दोन बालकांचे बळी घेतल्यानंतर लष्कर खडबडून जागे; बिबट्यांना रोखण्यासाठी संरक्षण भिंत दुरुस्ती व दिवे लावण्याचे काम सुरू

Syncope Symptoms: अभिनेता गोविंदाला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

SCROLL FOR NEXT