Customer refund from Union Bank esakal
नाशिक

Nashik News : युनियन बँकेकडून ग्राहकांचे पैसे परत; 4 ग्राहकांना व्याजासह पैशांचा परतावा

Nashik News : युनियन बँकेच्या मनमाड येथील शाखेत ग्राहकांच्या नावे बनावट मुदत ठेवी ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कार्यवाही सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : युनियन बँकेच्या मनमाड येथील शाखेत ग्राहकांच्या नावे बनावट मुदत ठेवी ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कार्यवाही सुरु केली आहे. त्यानंतर बँकेतर्फे गुरुवारी (ता. ३०) चार ग्राहकांना व्याजासह सर्व पैशांचा परतावा केला असून, लवकरात लवकर फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना पैशांचा योग्य परतावा करण्याचा विश्‍वास बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Customer refund from Union Bank)

मनमाड शहरातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अधिकारी असल्याचे भासवून काही व्यक्तींनी ग्राहकांची फसवणूक केली. बँकेचा त्यांच्या व्यवहारांशी संबंध नसतानाही हा प्रकार घडल्यामुळे युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत ‘ॲक्शन’ घेत चार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून ग्राहकांना पैसे देण्यास सुरवात केली. (latest marathi news)

चार ग्राहकांना व्याजासह पैसेही मिळाल्यामुळे त्यांनी बँकेविषयी सकारात्मक भावना व्यक्त केली आहे. सर्व ग्राहकांना बँकेच्या नियमांनुसार योग्य तो परतावा लवकरात लवकर दिला जाईल. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT