Tehsildar Surendra Deshmukh of Sinnar while training enumerators esakal
नाशिक

Nashik Maratha Survey : सिन्नर तालुक्यात 15,571 कुणबी नोंदी! 31 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

बहुतेक कुटुंबांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र महसूल विभागाकडून प्राप्त केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नरमधील महसूल, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, शिक्षण विभाग, पालिका, अशा विविध कार्यालयांतील सुमारे १० लाखांहून अधिक दस्तांची तपासणी केल्यानंतर तालुक्यात १५ हजार ५७१ कुणबीच्या नोंदी प्रशासनाला आढळल्या आहेत.

यातील बहुतेक कुटुंबांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र महसूल विभागाकडून प्राप्त केले आहे. (Nashik Maratha community Survey 15571 Kunbi records in Sinnar taluka Instructions to complete survey by 31)

दरम्यान, मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सिन्नर तालुक्यातील १२८ गावांमधील अचूक सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ४०३ प्रगणकांची नेमणूक केली आहे.

त्यांच्यावर २७ पर्यवेक्षक निगराणी ठेवणार आहेत. २३ ते ३१ दरम्यान नऊ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ४०३ शिक्षकांची प्रगणक म्हणून, तर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, अशा २७ जणांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

गेल्या आठवड्यात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सर्वच कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून, आरक्षण असलेल्या कुटुंबांच्या जातीचा ॲपमध्ये उल्लेख करताच त्या कुटुंबाचे सर्वेक्षण तिथेच थांबेल. उर्वरित मराठा आणि इतर आरक्षण नसलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा फॉर्म प्रगणकांना शेवटपर्यंत भरावा लागणार आहे.

नागरिकांनी त्यांना योग्य माहिती देऊन या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्री. देशमुख यांनी केले आहे.

असे होईल सर्वेक्षण

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकॉनॉमिक्स संस्थेने डेव्हलप केलेले ॲप प्रत्येक प्रगणकाच्या‌ मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले आहे. प्रगणक घरोघरी जाऊन ॲपमध्ये असलेला ३२ पानांचा फॉर्म भरून घेतील.

त्यात कुटुंबाची मूलभूत, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयकमाहिती भरावयाची आहे. १८२ प्रश्नांची प्रश्नावली ॲपमध्ये आहे.

शिवाय कागदी फार्मही प्रगणकाजवळ आहेत. फॉर्म अंतिम झाल्यानंतर त्यावर कुटुंबातील सदस्याने माहिती दिली त्याची स्वाक्षरी घेऊन ती स्कॅन करून ॲपमध्ये अपलोड करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT