Maratha Survey Allowance esakal
नाशिक

Maratha Survey Allowance : मराठा सर्वेक्षणाचा भत्ता दूरच, आता निवडणुकीचे काम! NMCचे 2600 कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

Nashik News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे २६०० कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी सर्वेक्षण भत्ता देण्याचे कबूल केले होते, परंतु अद्यापही सर्वेक्षण भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यात आता पुन्हा निवडणूक कामासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने नाराज कर्मचारी भत्त्यासाठी आंदोलनाची तयारी करत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Nashik Maratha survey allowance NMC news)

मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती तपासण्यासाठी २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका हद्दीत जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे जबाबदारी दिली होती. सर्वेक्षणासाठी ४.५२ लाख मिळकतीचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेच्या २६०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी प्रगणक म्हणून तर १५९ पर्यवेक्षक व ३१ प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. (latest marathi news)

शहरात एकूण चार लाख ५५ हजार ३५२ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना साडेदहा हजार रुपये भत्ता देण्याचे आदेशात नमुद होते. सर्वेक्षणानंतर महापालिकेने मागासवर्ग आयोगाला देयके सादर केले.

परंतु अद्यापही सर्वेक्षणाची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही. आर्थिक वर्षे उलटल्यानंतरही सर्वेक्षण भत्ता प्राप्त न झालेला नाही. सर्वेक्षण भत्त्याची रक्कम मिळतं नसताना आता लोकसभा निवडणुकीसाठी २५०० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

SCROLL FOR NEXT