Election  Esakal
नाशिक

Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणूक लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत लांबणीवर टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे बाजार समितीची निवडणूक साडेतीन महिने लांबणीवर पडली आहे. याबाबत, सहकार प्राधिकरणाकडून अधिकृतपणे पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून यास दुजोरा देण्यात आला आहे. (Nashik Market Committee Election Postponed till 15 march Nashik News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. २९ जानेवारीला मतदान होणार होते. दरम्यान, जिल्हयातील १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी उद्या (ता.१८) मतदान होत आहे. यातील नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीन तालुक्यांतील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. याशिवाय विनायक माळेकर, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे यांनी पेठमधील ७१, नाशिकमधील १८ तर, त्र्यंबकेश्वरमधील ५८ अशा एकूण १४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन देखील त्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार यादीत नसल्याची हरकत नोंदविली होती.

याबाबत सदानंद नवले यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्यावर सुनावणी झाली. यामध्ये नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १४७ ग्रामपंचायतींमधील सुमारे एक ते दीड हजारांपेक्षा जास्त नवनिर्वाचित सदस्यांना बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT