Former State Home Minister Anil Deshmukh esakal
नाशिक

Nashik News : शरद पवार- सुनील तटकरे यांची भेट! माजी मंत्री अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

Nashik News : शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते व मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा असतानाच शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (Meeting of Sharad Pawar and Sunil Tatkare Former Minister Anil Deshmukh claim)

यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री अनिल देशमुख दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता. १७) देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासणीवर टीका करताना देशमुख म्हणाले, की आधी आलेल्या बॅगांवर संशय होता म्हणून या वेळी चौकशीचा फार्स केला. बॅगा तपासण्याचे नाटक मुद्दाम केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ देखावा केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही.

सिंचन घोटाळ्यावर मोदींनी वक्तव्य केल्यावर अजितदादांची धावपळ झाली. देशात महायुती २०० जागा पार करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जितक्या जास्त सभा होतील, तितका महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. मोदींनी जास्त सभा घ्यावात, जेणेकरून महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी या वेळी लगावला. (latest marathi news)

शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र, आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देशमुख यांनी या वेळी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ४ जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज आहेत. कोणीही संपर्कात आला, तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही अनिल देशमुख यांनी या वेळी सांगितले.

देशमुखांचा दावा जयंत पाटलांनी फेटाळला

अनिल देशमुख यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र फेटाळला आहे. मी आणि शरद पवार नाशिकच्या एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो. मात्र, तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काही वेळापूर्वीच सुनील तटकरे नाशिकहून पालघरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सायंकाळच्या मुंबईतल्या महायुतीच्या सभेसाठीही ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT