Jadhav family saluting their father's memorial built in front of the house. esakal
नाशिक

Nashik News : वडिलांच्या आठवणींसाठी घरासमोरच बांधले स्मृतीस्थळ! जाधव कुटुंबियांचा आदर्श

Nashik : कष्टाची कायम आठवण राहावी म्हणून पिळकोस येथील शेतकरी कुटुंबियांनी वडिलांच्या निधनानंतर घरासमोरच बांधलेले स्मृतीस्थळ कौतुकाचा विषय ठरत आहे.

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आजच्या कलीयुगात शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील वृद्धाश्रम सुरु झाले असून, स्वतःला सुशिक्षीत समजणाऱ्या आजच्या पिढीला आई-वडील नकोसे वाटत असताना वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची कायम आठवण राहावी म्हणून पिळकोस येथील शेतकरी कुटुंबियांनी वडिलांच्या निधनानंतर घरासमोरच बांधलेले स्मृतीस्थळ कौतुकाचा विषय ठरत आहे. (Nashik memorial built in front of house for memories of father marathi news)

तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी दादाजी जाधव व साहेबराव जाधव यांनी वडील रेवबा पुंजाराम जाधव (९६) यांचे वृद्धापकाळात निधन झाल्यानंतर घरासमोर अंत्यसंस्कार केले. एका वर्षात त्या ठिकाणी भव्य स्मृतीस्थळही उभारले. शेतकरी वडिलांनी उभ्या आयुष्यभर गावातील धनाढ्य शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम केले. (Latest Marathi News)

गावातील इतरांच्या शेतात रक्ताचे पाणी करून राबराब राबत चार मुली, दोन मुले, पत्नी यांचे पालनपोषण केले. मुलांसाठी वडिलोपार्जित जमिन राखून ठेवली. हे करीत असतान स्वमालकीची जमीन बागायती केली. अपार कष्टातून मुला- मुलींचे विवाह केले. दोन मुलांना आदर्श शेतकरी घडवले. आज या मुलांनी वडिलांच्या कष्टाची कृतज्ञता म्हणून घरासमोरच स्मृतीस्थळ उभारले. त्यांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

''आमच्या वडिलांनी कुटुंबासाठी ५० वर्षांपर्यंत गावातील धनाढ्य शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम केले. आमच्या उज्वल भविष्यासाठी मेहनत घेतली. वडिलांच्या आठवणी व त्यांनी केलेले कार्य कायम डोळ्यासमोर राहावे व आमच्याबरोबर इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून हे स्मृतीस्थळ उभारले आहे.''- दादाजी जाधव, शेतकरी, पिळकोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT