Hike In Milk Rate latest marathi news esakal
नाशिक

Nashik Milk Rates Hike: दुधाच्या दरवाढीवर रिव्हर्स रेटने विरजण! उत्पादकांना प्रतिलिटर 8 रुपयांचा तोटा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Milk Rates Hike : गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचा स्वागतार्ह निर्णय शासनाने घेतलेला असताना दुधातील ‘फॅट’ कमी झाल्यास रिव्हर्स रेटही वाढविल्याने उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होण्याऐवजी फटका बसला.

दूध उत्पादकांना सद्यस्थितीला प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. (Nashik Milk Rates Hike Reverse rate on milk price hike loss of Rs 8 per liter to producers)

दुधाच्या दरात हस्तक्षेप करीत राज्य सरकारने प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचे निर्देश दूध संघांना दिले. सरकारच्या हस्तक्षेपानंतर उत्पादकांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, खासगी व सहकारी दूध संघांनी संगनमत करून ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. त्याचबरोबर ‘फॅट’ व ‘एसएनएफ’चे रिव्हर्स रेटही लागू केले. परिणामी, शेतकऱ्यांना पूर्वी मिळत असलेल्या दरापेक्षा आता कमी दर मिळत आहे.

सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून रिव्हर्स रेट पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळावा, अशी व्यवस्था करण्याची मागणी दूध उत्पादकांकडून होऊ लागली आहे.

राज्य सरकारने हस्तक्षेप करण्यापूर्वी रिव्हर्स रेट हा प्रति कमी होणाऱ्या एका पॉइंटसाठी २० पैसे होता. आता तो थेट ५० पैसे करण्यात आला आहे. ‘एसएनएफ’चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या पॉइंटसाठी ३० पैसे होता.

आता तो एक रुपया करण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २५ ते ३० रुपये भाव मिळत आहे. महाराष्ट्रात पशुधनाचे संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती व बीजामुळे बहुतांश संकरित गायींच्या दुधाला ‘फॅट’ व ‘डिग्री’ कमी असते.

शिवाय, पावसाळा असल्याने व हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे ‘फॅट’ व ‘एसएनएफ’ कमी झाले. त्यात रिव्हर्स रेट वाढविण्यात आल्याने दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पशुखाद्यही पाच टक्के महागले

दुधाचे दर वाढविण्याबरोबरच पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. प्रत्यक्षात हे दर कमी करण्याऐवजी १ ऑगस्टपासून पधुखाद्याचे दर पाच टक्क्यांनी वाढले आहेत.

"शासनाने ‘फॅट’ व ‘एसएनएफ’ पूर्वीप्रमाणे केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. उत्पादकांना योग्य दर देण्याचे प्रयत्न केले जात आहेत."

- पृथ्वीराज थोरात, संचालक, एस. आर. थोरात दूध उद्योगसमूह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT