Nashik Bus Accident
Nashik Bus Accident esakal
नाशिक

Nashik Bus Fire Accident : भय इथले संपत नाही...

नरेश हाळणोर

नाशिक : शनिवारी पहाटेचे अग्नितांडव... घटनास्थळावर मृतदेहांच्या अवशेषांचा सडा... तर, जिल्हा रुग्णालयात भाजलेल्या माणसांची शरीरे पाहून यमालाही शरम वाटावी अन्‌ अपघातानंतर आपापली माणसं भिरभिरत्या नजरेनं शोधत असताना, न दिसणाऱ्या माणसांना शवागारापर्यंत जडावलेल्या पायांनाही कंपने जाणावी, अशा भीषण वास्तवातला रविवार त्याच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात चिरशांततेचा.

कालची पाणावलेही पण आज कोरडी; पण त्याच भिरभिरत्या नजरांनी कोणी आपल्या वाचलेल्या माणसांचा उराशी धरून, तर ज्या नजरांना त्यांची माणसं नाही सापडली ते हाती आलेल्या शवाला घेत आपल्या मायभूमीकडे गेली. पण कालच्या अन्‌ आजच्या वातावरणात भय होतं तसंच होतं. भय इथले संपलेलं नव्हतं... (Nashik Mirchi hotel adgaon bus fire accident Nashik Latest News)

शनिवारची (ता. ८) पहाट चिंतामणी ट्रॅव्हल्समधील ५३ प्रवाशांसाठी मृत्यूचे तांडव करणारी पहाटच ठरली. यातल्या १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका वृद्धेसह तिच्या अवघ्या तीन वर्षांच्या नातीचा समावेश आहे. अपघातानंतरचा सुमारे पाऊण तास आगीच्या भडक्यात पेटणारी बस अन्‌ ज्यांना बाहेर पडता आले नाही ते १२ प्रवासी आगीत होरपळले.

हे सारे अग्नितांडव बचावलेल्या प्रवाशांनी बघितले. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. जखमींना मिळेत त्या साधनांतून रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. जखमी रुग्णांवर उपचार, तर दुसरीकडे शवागारातील मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे असताना, व्हीव्हीआयपीचे दौरे येऊ लागल्याने साऱ्याच पातळीवर ताणतणावाची स्थिती निर्माण होऊन जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली.

या साऱ्यांतून बचावलेल्या काही नजरा मात्र आपल्या माणसांना शोधत होती. अपघातानंतरचे अग्नितांडव अजूनही काहींच्या नजरेआड होत नसताना रुग्णालयात पावलापावलावर अनेकांकडून होणारी प्रश्‍नांच्या सरबत्तीने काहींना काहीही सुचेनासेच झाले. पहाटेचे अग्नितांडव दुपारपर्यंत थंडावले.

पण, काहींच्या ओळखीच्या नजरा नजरेला भिडू लागल्या अन्‌ काही नजरांना आपली माणसं नजरेला पडेनात... नावांचा शोध घेऊनही ते सापडत नाही म्हटल्यावर शवागाराची वाट चालताना अनेकांच्या पायांचा होणार थरकाप धरणीलाही कळत असावा. पण काळ्याकुट्ट मृतदेहातून आपला माणूस शोधताना होणारी त्यांच्या जिवाची घालमेल पाहून अनेकांना कडा ओलावल्या.

शनिवार संपला, रविवार उजाडला. भिरभिरणाऱ्या नजरा त्याच होत्या. कालसारखी पहाट नव्हती की नंतरचा कोलाहलही. पण कालच्या ओलावलेल्या नजरा आज कोरड्या असल्या तरी त्यामागे भय कायम होते. चेहऱ्यावर शांतता होती; पण मनात कालचे अग्नितांडव जणू अजूनही धगधगत होतं. काहींच्या नजरांसमोर त्यांची माणसं पोचली होती. तर आपल्या माणसांना शोधत आलेल्या भिरभिरत्या नजरा अजूनही त्यांचा माणूस दिसेल अशी आशा बाळगून बाहेरच्या कोपऱ्यात बसून होते. भय संपले असे वाटत होतं; पण संपलेलं नव्हतं...

‘तो’ रोजगाराच्या शोधात निघाला होता

या भीषण अपघातात उद्धव भिलंग (वय ४४) व वैभव भिलंग (२३) या काका-पुतण्याला आपला जीव गमवावा लागला. वाशीमच्या मालेगाव तालुक्यातील पारोडीचे हे दोघे रहिवासी. २३ वर्षीय पुतण्या वैभव बेरोजगार असल्याने त्याला काहीतरी रोजगाराला लावून देण्यासाठी म्हणून काका उद्धव त्याला घेऊन मुंबईला निघाले होते. दुर्दैव, दोघाही काका-पुतण्याला मुंबई गाठण्यापूर्वीच मृत्यूने गाठले. वैभव गेल्याचे त्याच्या कुटुंबीयांना अजूनही विश्‍वास बसत नाही. अत्यंत जड अंत:करणाने दोघांचे मृतदेह ताब्यात घेताना नातलगांचा शोक पाहताना अनेकांना गलबलून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT